कोमल दामुद्रे
नवीन वर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. येणारे प्रत्येक वर्ष आनंदी, भरभराटी घेऊन येवो अशी सगळ्यांची इच्छा असते.
ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी ५ वस्तू घरात आणल्यानंतर देवी लक्ष्मीची कृपा वर्षभर राहाते असे म्हटले जाते.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरात तुळशीचे रोपटे लावा. याची नियमितपणे पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न राहिल.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला नारळ आणू शकता. त्याची पूजा करुन पैशांच्या ठिकाणी किंवा तिजोरीत ठेवा.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला धातूचे कासव देखील खरेदी करु शकता. हे नशीब आणि समृद्धीचे प्रतीक देखील मानले जाते.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी ११ गोमती चक्र घरी आणा. त्यांना पिवळ्या कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवल्याने लक्ष्मीची कृपा राहाते.
नवीन वर्षात सुरुवातीला मोराची पिसे घरी आणणे देखील शुभ मानले जाते. घरात आणल्याने घराची स्थितीही मजबूत होते.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.
Next : Christmas ला Oven न वापरता घराच्या घरी ट्राय करा Eggless Rasmalai Cake, पाहा Recipe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.