Silent heart attack warning and symptoms google
लाईफस्टाईल

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅक येण्यापूर्वी फक्त रात्री दिसतात ही लक्षणं; दुर्लक्ष करू नका

Night symptoms before a heart attack: हृदयविकाराचा झटका ही जगातील सर्वात गंभीर आरोग्य समस्यांपैकी एक आहे. अनेकदा, हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर काही संकेत देते.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे आजारांच्या प्रमाणातही वाढ झाल्याचं दिसून येतंय. यामध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाणही अधिक आहे. गेल्या काही वर्षांत हार्ट अटॅक येण्याच्या प्रकरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मानसिक आरोग्याची बिघडलेली स्थिती, ताणतणाव हे घटक हार्ट अटॅकला कारणीभूत ठरतायत.

यासाठी सर्वात आव्हानात्मक घटक म्हणजे उच्च रक्तदाब (High Blood Pressure). हृदयाच्या आरोग्याशी संबंधित या वाढत्या संकटामुळे लक्षणं ओळखणे अत्यंत गरजेचं आहे. रात्रीच्या वेळेस हार्ट अटॅक जास्त येत असल्याचं दिसून येतं. अशावेळी रात्रीच्या वेळी हार्ट अटॅक येण्यापूर्वी कोणते संकेत दिसतात ते पाहूयात.

छातीत अस्वस्थता

छातीत कोणत्याही प्रकारची अस्वस्थता किंवा वेदना, दाब, घट्टपणा जाणवणं हे हृदयविकाराच्या झटक्याचं महत्त्वाचं लक्षण असू शकतं. अनेकदा हे लक्षण दुर्लक्षित केलं जातं.

श्वास घेण्यास त्रास

हृदयविकाराच्या झटक्याच्या सुरुवातीला अनेक लोकांना श्वास घेण्यास त्रास होतो. अनेकदा कोणतंही काम न करताही हा त्रास होऊ शकतो. अनपेक्षित श्वास घेण्याचा त्रास हा हृदयविकाराचा संकेत असू शकतो.

मळमळ

मळमळ ही हृदयविकाराच्या झटक्याच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक आहे. मळमळ, भोवळ येणं किंवा बेशुद्ध पडणं हे गंभीर संकेत आहेत. जर हा त्रास सातत्याने होत असेल तर डॉक्टरांची मदत घेणं फायदेशीर आहे.

सततचा थकवा

अत्यंत थकवा किंवा अनपेक्षित अशक्तपणा जाणवत असेल तर हार्ट अटॅक येण्याचे संकेत नाकारता येत नाही. हा थकवा तुम्हाला अचानक जाणत असेल तर त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

थंड घाम येणं

वारंवार थंड घाम येणे किंवा अचानक थंड घाम फुटणं हे देखील एक लक्षण आहे. मुख्य म्हणजे कोणतंही कारण नसताना घाम येत असेल तर समजा काहीतरी बिघाड झालाय.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: TET पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळी जेरबंद

मोठी बातमी! नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला गुजरात पोलिसांनी केली अटक, नेमकं प्रकरण काय ?

Anant Garje: अनैतिक संबंध, मोबाइलवर चॅटिंग; समजूत काढूनही तीच चूक; बायकोच्या आत्महत्येनंतर अनंत गर्जेंवर गंभीर आरोप

Vande Bharat Express : नागपूर वंदे भारत एक्सप्रेसबाबत मोठी अपडेट, रेल्वेने नेमका काय घेतला निर्णय?

khajur Benefit: हिवाळ्यात रोज ३ खजूर खल्ल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT