Early signs of a brain tumor saam tv
लाईफस्टाईल

Early signs of a brain tumor: मेंदूमध्ये ट्यूमरची निर्मिती झाल्यानंतर शरीरात होतात 'हे' बदल; लक्षणं दिसताच डॉक्टरांची भेट घ्या

Brain tumor symptoms: ब्रेन ट्यूमर हा एक गंभीर आजार आहे, जो मेंदूमध्ये पेशींच्या असामान्य वाढीमुळे होतो. या आजाराची लक्षणे (Symptoms) सुरुवातीला सामान्य वाटू शकतात, त्यामुळे अनेकदा लोक त्याकडे दुर्लक्ष करतात.

Surabhi Jayashree Jagdish

  • मेंदू हा शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे.

  • मेंदूतील ट्यूमर प्राथमिक किंवा दुय्यम असू शकतो.

  • सततची डोकेदुखी हे ट्यूमरचे महत्त्वाचे लक्षण आहे.

आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव म्हणजे मेंदू. तो विचार करण्याचं, आठवणी ठेवण्याचं आणि शरीराच्या प्रत्येक हालचालीवर नियंत्रण ठेवण्याचं काम करतो. परंतु जेव्हा मेंदूमध्ये असामान्य पेशी तयार होऊ लागतात तेव्हा त्या अवस्थेला मेंदूतील ट्यूमर (ब्रेन ट्यूमर) असं म्हटलं जातं.

ब्रेनमध्ये ट्यूमर हा आजार कुठल्याही वयात आणि कुणालाही होऊ शकतो. याचे परिणाम केवळ शारीरिकच नाहीत तर मानसिक आणि भावनिक स्तरावरदेखील खोलवर जाणवतात.

मेंदूतील ट्यूमरचे प्रकार

सामान्यतः ब्रेन ट्यूमर दोन प्रकारचे असतात. पहिला म्हणजे प्राथमिक (प्राइमरी) ट्यूमर, जो थेट मेंदूमध्ये किंवा त्याच्या आसपासच्या रचनेत निर्माण होतो. दुसरा म्हणजे दुय्यम (सेकंडरी) किंवा मेटास्टॅटिक ट्यूमर, जो शरीराच्या इतर भागांमधून पसरून मेंदूपर्यंत पोहोचतो.

काही वेळा ट्यूमर हळूहळू वाढतो आणि सुरुवातीची लक्षणं किरकोळ स्वरूपाची असल्यामुळे लोक ती दुर्लक्ष करतात. परंतु काही ट्यूमर अतिशय जलद गतीने वाढतात आणि अचानक गंभीर लक्षणं दिसू लागतात. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या अगदी छोट्याशा बदलाकडेही गांभीर्याने पाहणं गरजेचं असतं. योग्य वेळी निदान आणि उपचार झाल्यास या आजारावर नियंत्रण मिळवता येते.

मेंदूतील ट्यूमरची लक्षणं

  • सतत जाणवणारा डोकेदुखीचा त्रास

  • सकाळी उठल्यावर डोक्यात ताण जाणवणे

  • मळमळ किंवा उलटी

याशिवाय डोळ्यांच्या समस्या जसं धूसर दिसणं, दुप्पट दिसणं किंवा दृष्टी कमजोर होणं हेही मेंदूतील ट्यूमरचे संकेत असू शकतात. हातपायात अशक्तपणा, चालण्यात तोल जाणं, बोलण्यात किंवा ऐकण्यात अडचण येणं, थकवा, स्मरणशक्ती कमी होणं आणि व्यक्तिमत्त्वात अचानक बदल दिसणं ही देखील या आजाराची लक्षणं असू शकतात.

काही ट्यूमर इतके लहान असतात की सुरुवातीला त्यांचा अंदाजच लागत नाही. मात्र त्यांची काही सूक्ष्म लक्षणे असू शकतात –

  • स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रीत करण्यात अडचण

  • वागण्यात बदल होणं

  • बोलताना हलकी अडचण

  • वास किंवा चव ओळखण्याची क्षमता कमी होणं

  • झोपेचे विकार

  • हळूहळू दृष्टीत बदल

  • हातपायात मुंग्या येणं

  • सौम्य पण सतत जाणवणारी डोकेदुखी

तज्ज्ञांच्या मते, ही लक्षणे सामान्य आजारांसारखी भासू शकतात. पण जर ती सातत्याने वाढत असतील, तर तात्काळ वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.

मेंदूतील ट्यूमरचा उपचार

  • शस्त्रक्रिया (सर्जरी)

  • रेडिएशन थेरपी

  • किमोथेरपी

  • टार्गेटेड थेरपी

याशिवाय इम्युनोथेरपी, हार्मोन थेरपी आणि सहाय्यक देखभाल (सपोर्टिव्ह केअर) देखील रुग्णाच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी उपयोगी ठरतात.

तज्ज्ञांचं मत आहे की, योग्य आणि वेळेवर उपचार घेतल्यास या आजारामुळे होणारे गंभीर परिणाम मोठ्या प्रमाणात टाळता येतात. म्हणूनच डोकेदुखी, दृष्टीत बदल, चालताना तोल जाणं किंवा अचानक झटके येणं यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

मेंदूतील ट्यूमरचे प्रमुख प्रकार कोणते?

प्राथमिक आणि दुय्यम (मेटास्टॅटिक) ट्यूमर.

मेंदूतील ट्यूमरचे सर्वात सामान्य लक्षण कोणते?

सतत जाणवणारी डोकेदुखी.

दृष्टीत बदल कोणत्या आजाराचे लक्षण आहे?

मेंदूतील ट्यूमरचे लक्षण आहे.

मेंदूतील ट्यूमरचा उपचार कोणत्या पद्धतीने केला जातो?

शस्त्रक्रिया, रेडिएशन आणि किमोथेरपीने.

ट्यूमरची लक्षणे दिसल्यास काय करावे?

तातडीने वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर हल्ला, जालन्यात मराठा आंदोलक आक्रमक, नेमकं काय घडलं?

Crime News : भजन ऐकायला निघाली, वाटेत अडवलं अन् मूकबधिर मुलीवर सामूहिक बलात्कार

Maharashtra Live News Update: वकील गुणरत्न सदावर्ते धनगर आंदोलक दिपक बोऱ्हाडे यांच्या भेटीसाठी जालन्यात दाखल

Pregnancy Care: प्रसूतीनंतर केस गळतीची भीती? तज्ज्ञ सांगतात खरे कारण आणि उपाय

Pune : पुण्यात बैलपोळा मिरवणुकीत थिरकल्या नृत्यांगणा, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT