Monsoon orthopedic injuries children saam tv
लाईफस्टाईल

Monsoon sports injuries: पावसाळ्यात मुलांमध्ये वाढतोय ऑर्थोपेडिक दुखापतींचा धोका; काळजी घेण्याचं तज्ज्ञांचं आवाहन

Monsoon orthopedic injuries children: पावसाळा हा निसर्गाचा आनंद घेण्यासाठी एक सुंदर ऋतू असला तरी, अनेक आरोग्य आणि सुरक्षा धोके घेऊन येतो. यामध्ये, विशेषतः लहान मुलांमधील अस्थिभंग म्हणजेच हाडांचे फ्रॅक्चर (Fractures) सारख्या दुखापतींचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे.

Surabhi Jayashree Jagdish

पावसाळ्यात केवळ प्रौढांमध्येच नव्हे तर मुलांमध्येही पाय घसरणं, पडणं आणि फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. अशा ऑर्थोपेडिक दुखापतींना रोखण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स याठिकाणी देण्यात आल्या आहेत. या टिप्सचे पालन करुन भविष्यातील दुखापती, वेदना आणि गतिहीनता टाळता येऊ शकते.

ऑर्थोपेडिक स्पाइन सर्जन डॉ. आयुष शर्मा यांनी सांगितलं की, पावसाळ्यात जिकडे तिकडे पाण्याने भरलेले डबके, चिखलाने भरलेले मैदानं आणि निसरडे पृष्ठभाग पहायला मिळतात. मात्र अशावेळी खेळताना अनेक दुखारतींना आमंत्रण मिळू शकते आणि म्हणूनच या दिवसात ऑर्थोपेडिक दुखापतींमध्ये वाढ होते. ओल्या पृष्ठभागामुळे पावसाळ्यात मुलांमध्ये पाय मुरगळणे, फ्रॅक्चर आणि सांधे दुखापतीचे अनेक प्रकार घडतात. पालकांनी हे धोके समजून घेणे हे त्यांच्या मुलांना टाळता येण्याजोग्या वेदना आणि दीर्घकालीन सांधेदुखीच्या समस्यांपासून सुरक्षित ठेवण्याचे पहिले पाऊल आहे.

पावसाळ्यात मुलांमध्ये होणाऱ्या सामान्य ऑर्थोपेडिक दुखापती

पडल्याने होणाऱ्या दुखापती

मैदानांवर पाणी साचल्याने शाळेच्या कॉरिडॉरमध्ये तसेच घराच्या फरशीवर मुलं सहजपणे घसरू शकतात, ज्यामुळे पाय मुरगळण्यासारख्या दुखापती होतात. यामुळे गुडघ्याला दुखापत होते किंवा अगदी फ्रॅक्चर देखील होऊ शकते. मुलाला पुन्हा शाळेत जाण्यास वेळ लागू शकतो आणि त्याच्या/तिच्या शैक्षणिक कामगिरीवर देखील परिणाम होऊ शकतो.

मनगट आणि हात फ्रॅक्चर होणं

मुलं अनेकदा पडताना हाताचा आधार घ्यायचा प्रयत्न करतात आणि अशा परिस्थितीत हातावर जोर येऊन ज्यामुळे मनगट, कोपर किंवा हात फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. यासाठी विशेष सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

पायाच्या दुखापती

चिखलाच्या भागात अनवाणी किंवा सैल पादत्राणं घालून चालल्याने पायाचे बोट मोडणे, घोट्याच्या दुखापती किंवा अगदी लिगामेंट फाटण्यासारख्या दुखापती होऊ शकतात. या दुखापती अत्यंत वेदनादायक ठरु शकतात आणि याकरिता मुलाला त्वरित उपचाराची आवश्यकता भासते.

खेळाच्या दुखापती

घरातील खेळ किंवा पावसाळ्याच्या दिवसात बाहेर खेळताना पाय घसरुन स्नायूवर ताण येऊ शकतो आणि सांधे ताणले जाऊ शकतात. म्हणून, कोणताही खेळ खेळताना मुलांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.

पालकांसाठी आवश्यक टिप्स

तुमच्या मुलाने अँटी-स्लिप, पाय पूर्णपणे झाकणारी पादत्राणे घालावी जे योग्य आधार देतील आणि पाय घसरण्यापासून सुरक्षित ठेवतील. मुलांनी गुळगुळीच चप्पल किंवा मोठ्या आकाराचे शूजचा वापर करणे टाळा. मुलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी घरात, शाळेत किंवा खेळाच्या मैदानावर निसरड्या जागा, ओल्या पायऱ्या आणि निसरड्या टाइल्स तपासा. दुखापत टाळण्यासाठी मुलांना ओल्या पृष्ठभागावर धावताना किंवा उडी मारताना काळजी घेण्यास प्रोत्साहित करा.

कोणतीही दुखापत टाळण्यासाठी लहान मुलांवर बारकाईने लक्ष ठेवा. किरकोळ दुखापतींवर त्वरीच उपचाराकरिता घरी अँटीसेप्टिक्स, बँडेज आणि बर्फाचे पॅक ठेवा. कोणतीही सूज, लंगडणे किंवा वेदनांकडे दुर्लक्ष करू नका. पालकांनी हे लक्षात ठेवा की, वेळीच उपचार ही भविष्यातील गुंतागुंत टाळतात आणि गतिशीलतेवर परिणाम करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple Devices: IPhone 17 लॉंच होताच, बंद होणार अ‍ॅप्पलचे 'हे' डिव्हाईस

पठाणकोटमध्ये २५ जवानांना कसं वाचवलं; अंगावर शहारे आणणारं रेस्क्यू ऑपरेशन | VIDEO

Shocking: भयंकर! तरुणाच्या गुद्दद्वारात अडकला पाईपचा तुकडा; एक्स-रे काढल्यानंतर डॉक्टरही चक्रावले

Horoscope Thursday : ५ राशींच्या वाटेतली विघ्न दूर होणार, स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेणार; वाचा गुरुवारचे खास राशीभविष्य

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर बर्निंग बाईकचा थरार

SCROLL FOR NEXT