ICMR report cancer India: भारतात 'या' दोन कॅन्सरच्या रूग्णांमध्ये होतेय झपाट्याने वाढ; ICMR रिपोर्टमधून चिंताजनक बाबी समोर

Increasing cancer cases in India: ICMR च्या एका अलीकडील अहवालानुसार, भारतात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. या अहवालातील आकडेवारी अत्यंत चिंताजनक असून, यामध्ये विशेषतः दोन प्रकारच्या कर्करोगाचे रुग्ण वेगाने वाढताना दिसत आहेत.
Increasing cancer cases in India
Increasing cancer cases in Indiasaam tv
Published On

भारतात कॅन्सरचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. देशात कॅन्सरचं निदान उशिरा होणं, उपचारांचा खर्च आणि उपचार सुविधांची कमतरता यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतोय. देशातील आरोग्य यंत्रणा अजूनही कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराशी लढण्यासाठी पुरेशी सिद्ध झालेली नाही. अशातच ICMR ने एक रिपोर्ट जाहीर केला आहे.

भारतामध्ये अजूनही कॅन्सरच्या उपचारांसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. सरकारी रुग्णालयांमध्ये अत्यंत मर्यादित उपचार मिळतात, तर खासगी रुग्णालयांचा खर्च सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचा आहे. दिल्लीतील एम्ससारख्या मोठ्या संस्थांमध्ये उपचार सुविधा असल्या तरी रुग्णांची संख्या इतकी प्रचंड असते की, वेळेत उपचार मिळणं अवघड होतं. अशा परिस्थितीत निदान झाल्यानंतरही रुग्ण अनेक वेळा योग्य वेळी उपचार न मिळाल्यामुळे गंभीर अवस्थेत पोहोचतो.

कॅन्सरवर ICMR चा रिपोर्ट काय सांगतो?

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) च्या अहवालानुसार, 2020 सालात भारतात सुमारे 13.9 लाख कॅन्सरच्या रूग्णांची नोंद करण्यात आली होती. दरम्यान ही संख्या 2025 पर्यंत 15.6 लाखांवर जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच पाच वर्षांत सुमारे 12 टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज आहे. हा आकडा चिंताजनक असून त्यानुसार आपल्याला आधीपासून तयारी करणं अत्यंत गरजेचं आहे.

Increasing cancer cases in India
Silent heart attack symptoms: सायलेंट हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीरात होतात 'हे' मोठे बदल; संकेत लक्षात येणं फारच कठीण

कोणत्या प्रकारच्या कॅन्सरमध्ये होतेय वाढ

या अहवालात सर्वात झपाट्याने वाढणाऱ्या दोन कॅन्सरच्या प्रकारांबाबत माहिती देण्यात आली यामध्ये महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि पुरुषांमध्ये तोंडाचा कॅन्सरचं प्रमाण वाढत असल्याचं समोर आलंय. याशिवाय फुफ्फुसांचा कॅन्सर, पोटाचा कॅन्सर, गर्भाशयमुखाचा (सर्व्हायकल), मोठ्या आतड्यांचा (कोलोरेक्टल) आणि त्वचेचा कॅन्सर हे प्रकार देखील मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत.

का वाढतायत कॅन्सरची प्रकरणं?

कॅन्सरसारखा गंभीर आजार वाढण्यामागे अनेक कारणं आहेत. यामागील मुख्य कारण म्हणजे बदललेली जीवनशैली, चुकीच्या खाण्याच्या सवयी, शारीरिक हालचालींचा अभाव, प्रदूषण इत्यादी. याशिवाय तंबाखू, धूम्रपान, मद्यपान यांसारख्या व्यसनांचं प्रमाणही भारतात मोठ्या प्रमाणात आहे.

Increasing cancer cases in India
Varicose veins treatment: शस्त्रक्रियेशिवाय 'या' पद्धतींनी व्हेरिकोज्ह व्हेन्सवर उपचार करणं शक्य; तज्ज्ञांनी दिली आधुनिक उपचारांची माहिती

मॅक्स रूग्णालयातील ऑन्कोलॉजिस्ट डॉ. रोहित कपूर यांच्या मते, स्त्रियांच्या आरोग्यात झालेले बदल ब्रेस्ट कॅन्सर वाढण्यास कारणीभूत ठरतायत. यामध्ये उशिरा लग्न, उशिरा गरोदरपण, स्तनपान न करणं किंवा कमी करणे, वाढता मानसिक तणाव, व्यायामाचा अभाव आणि लठ्ठपणा ही मुख्य कारणं आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतायत. याचा मोठा फटका त्यांच्या आरोग्याला बसतो.

Increasing cancer cases in India
Heart attack warning signs: महिलांना हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसतात ही 6 महत्त्वाची लक्षणं; सामान्य समजून दुर्लक्ष करू नका

मुखाचा कॅन्सर वाढण्यामागचं कारण

पुरुषांमध्ये तोंडाचा कॅन्सर झपाट्याने वाढतो आहे आणि यामागे तंबाखू, गुटखा, पान, आणि धूम्रपान यांसारख्या सवयी जबाबदार आहेत. तोंडाची स्वच्छता राखली जात नाही. नियमित तपासणी केली जात नाही आणि त्यामुळे तोंडातल्या जखमा, गाठी वेळेवर लक्षात येत नाहीत. या कारणांमुळे तोंडाचा कॅन्सर अगदी सामान्य आणि धोकादायक प्रमाणात वाढतो आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com