ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकांना जेवणांनतर डाएट सोडा पिण्याची सवय असते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, अतिप्रमाणात डाएट सोडा प्यायल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो, जाणून घ्या.
डाएट सोडामध्ये आर्टिफिशयल स्वीटनर्स वापरले जातात.
दररोज डाएट सोडा प्यायल्याने गोड खाण्याची इच्छा वाढते. यामुळे वजन वाढू शकते.
डाएट सोडा प्यायल्याने पोटात गॅस होण्याची शक्यता वाढते.
अतिप्रमाणात डाएट सोडा प्यायल्याने हृदयरोगाचा धोका वाढू शकतो.
डाएट सोडामध्ये जास्त प्रमाणात अॅसिड असते. ज्यामुळे दात खराब होण्याची शक्यता वाढते.
सोडा प्यायल्याने तहान भागत नाही ,याउलट जास्त तहान लागते.