ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
झोपताना केस मोकळे ठेवल्याने केसामध्ये गुंता होतो. तसेच केस जास्त प्रमाणात तुटण्याची शक्यता वाढते.
केस बांधून झोपल्याने केसांचा गुंता कमी होतो. आणि केस निरोगी राहतात.
झोपताना सिल्कच्या उशीचा वापर करा. यामुळे केसमांमध्ये गुंता होत नाही.
झोपताना सैल वेणी किंवा सैल पोनीटेल बांधून झोपू शकता.
केसांना तेल लावून झोपल्याने केसांना पोषण मिळते आणि केस सॉफ्ट होतात.
कोणत्याही प्रकारच्या घट्ट हेअर स्टाइल करु नका. यामुळे केसांच्या मुळांवर ताण येऊ शकतो.
केसांची नियमित आणि योग्य काळजी घेतल्याने केस निरोगी आणि मजबूत होतात.