ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जगात अशी काही फुलं आहेत जी दिसायला खूप सुंदर दिसतात. परंतु त्यांना स्पर्श केल्यास जीवाला धोका होऊ शकतो. ही फुलं कोणती, जाणून घ्या.
बेलाडोना फुलाला ही काळ्या बेरीसारखे फळ येतात. परंतु, प्रत्यक्षात हे फूल धोकादायक आहे. याला स्पर्श केल्याने हृदयाचे ठोके मंदावू शकतात.
ऑलिंडर हे फूल खूप सुंदर असले तरी खूप विषारी आहे. या फुलाच्या पानांममध्ये आणि बियांमध्ये देखील विष असते.
मैनकीनील प्लांटला डेड अॅप्पल प्लांट देखील म्हटले जाते. हे रोप फ्लोरिडा आणि कॅरिबियन बेटांवर आढळते. या फुलाच्या विषाने माणूल आंधळा होऊ शकतो.
रिकिनस कोम्युनिस या झाडाला स्पर्श करताच अतिसार होऊ शकतो.
फॉक्सग्लोव्ह फूल सुंदर दिसण्यासोबतच याचा वापर औषधांसाठीही केला जातो. परंतु यामध्ये असलेले विष हृदयाचे ठोके थांबवू शकतात.
हायड्रेंजिया फूल निळ्या रंगाचे असतात. या फुलांमध्ये सायननाइड विष असते. यामुळे एखादी व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.