ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
२ केळी, १ कप मैदा, १/२ कप साखर, १/२ कप बटर किंवा तेल, १/२ दूध, १ चमचा बेकिंग पावडर, १/२ बेकिंग सोडा, मीठ आणि वेनिला एसेन्स
सर्वप्रथम ओव्हन १८० डिग्री सेल्सियसवर प्री हीट करा.
एका भांड्यामध्ये मैदा, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, आणि मीठ चाळून घ्या.
यामध्ये मॅश केले केळी, साखर आणि बटर घालून मिश्रण चांगले मिसळून घ्या.
आता या मिश्रणामध्ये दूध आणि उरलेले सर्व साहित्य मिक्स करा. जर तुम्हाला यामध्ये वेनिला फ्लेवर हवा असेल तर तुम्ही यामध्ये व्हेनिला एसेंस मिक्स करु शकता.
केक मोल्डला हलके बटर लावून घ्या. यानंतर तयार केलेले बॅटर, केक मोल्डमध्ये घालून सेट करा.
प्रीहीट ओव्हनमध्ये ३० ते ३५ मिनिटांसाठी केक बेक करा. टूथपिकने केक पूर्णपणे बेक झाला की नाही हे चेक करा.
टेस्टी बनाना केक तयार आहे. केक थंड झाल्यावर संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सर्व्ह करा.