Diabetes: हाय ब्लड शुगर असल्यास 'या' गोष्टी खाणं टाळा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हाय बल्ड शुगर

जेव्हा शरीरात इन्सुलिन हार्मोन योग्यरित्या कार्य करत नाही तेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण म्हणजेच ब्लड शुगर लेव्हल वाढते.

Diabetes | yandex

हे पदार्थ खाऊ नका

हाय बल्ड शुगर असलेल्या रुग्णांनी त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी. अशा परिस्थितीत त्यांनी हे 5 पदार्थ खाणे टाळावे.

Diabetes | google

ब्रेड

पांढरे ब्रेड, पास्ता, नूडल्स, समोसे यांसारख्या मैदापासून बनलेल्या पदार्थांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. यामुळे साखरेची पातळी खूप लवकर वाढते.

Diabetes | yandex

गोड पेये

कोल्ड्रिंक्स, पॅकेज्ड फ्रूट ज्यूस आणि एनर्जी ड्रिंक्समध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. हाय बल्ड शुगर असलेल्या रुग्णांनी याचे सेवन करणे टाळावे.

Diabetes | freepik

केक, पेस्ट्री आणि बिस्किटे

केक, पेस्ट्री आणि बिस्किटांमध्ये रिफाइंड साखर, मैदा आणि अनहेल्दी फॅट्स असतात. हे इन्सुलिनमध्ये अडथळा आणतात आणि बल्ड शुगर वाढवतात.

Diabetes | yandex

भात आणि बटाटा

तांदूळ आणि बटाट्यामध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असते. याचे सेवन केल्याने साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते.

Diabetes | yandex

स्नॅक्स

चिप्स आणि फ्रेंच फ्राईज हे तळलेले आणि जास्त कॅलरी असलेले पदार्थ आहेत. यात भरपूर ट्रान्स फॅट आणि मीठ देखील असते, जे हाय बल्ड शुगर लेव्हल असलेल्या रुग्णांसाठी धोकादायक आहे.

Diabetes | Freepik

NEXT: मनी प्लांट पाण्यात की मातीत लावावे, काय फायदेशीर?

Money Plant | Yandex
येथे क्लिक करा