ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बहुतेक घरांमध्ये लोक सकारात्मक उर्जेसाठी मनी प्लांट लावतात आणि काही लोक त्याचा संबंध संपत्तीशी देखील जोडतात.
हे रोप माती आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी लावता येते आणि ते पाण्यात आणि माती दोन्हीमध्ये सारखेच वाढते.
या वनस्पतीला जास्त सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसते, म्हणून ती घरामध्ये देखील चांगली वाढते.
पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की मनी प्लांट मातीत लावणे जास्त फायदेशीर आहे की पाण्यात लावणे, जाणून घ्या.
मनी प्लांटचा एक तुकडा पाण्याच्या बाटलीत ठेवा आणि त्याचे पाणी नियमितपणे बदला. पाण्याच्या बाटलीत किंवा जारमध्ये ठेवलेला मनी प्लांट सुंदर दिसतो आणि तसेच याची काळजी घेणे देखली सोपे होते.
पाण्यात लावलेल्या मनी प्लांटपेक्षा मातीत लावलेला मनी प्लांट अधिक चांगले वाढते.
मातीत लावलेल्या मनी प्लांटची वाढ पाण्यात लावलेल्या मनी प्लांटपेक्षा जास्त होते. जर तुमचे रोप खूप लहान असेल तर लवकर वाढण्यासाठी जमिनीत लावू शकता.