ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कर्नाटकमध्ये फिरण्यासाठी अनेक सुंदर आणि प्रसिद्ध ठिकाणे आहेत. येथे पर्यटक मोठ्या संख्येने फिरण्यासाठी येतात.
आज, आम्ही तुम्हाला कर्नाटकमध्ये जोडीदारासोबत फिरण्यासाठी बेस्ट ठिकाणांबद्दल सांगणार आहोत.
हम्पी हे कर्नाटकमधील ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेले ठिकाण आहे. येथे जगभरातून अनेक पर्यटक फिरण्यासाठी येतात.
मैसूरमध्ये तुम्ही मैसूर पॅलेस, वृदांवन गार्डन सारख्या प्रसिद्ध ठिकाणांना भेट देऊ शकता. याशिवाय, चामुंडी हिल्सला भेट देऊ शकता.
उडुप्पीमधील स्वच्छ आणि सुंदर समद्रकिनाऱ्यावर तुम्ही तुमच्या जोडीदारासह चांगला वेळ घालवू शकता. तसेच येथे अनेक प्रसिद्ध धार्मिक स्थळे देखील आहेत.
कुर्गला भारतातील स्कॉटलँड देखील म्हटले जाते. येथील शांतपूर्ण वातावरण तसेच मनमोहक दृश्ये तुमच्या मनाला भुरळ घालतील.
चिकमगळूर हे कॉफीच्या मळ्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे भेट द्यायला विसरु नका.