Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन रजिस्ट्रेशन कसे करावे? वाचा संपूर्ण प्रोसेस

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमरनाथ यात्रा

अमरनाथ यात्रा सुरू झाली आहे आणि प्रत्येक भाविक बाबा बर्फानीच्या दर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहे. ३ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान सुरू होणाऱ्या या अमरनाथ यात्रेत कोणत्याही भाविकाला रजिस्ट्रेशन शिवाय प्रवास करण्याची परवानगी दिली जात नाही.

registaration | google

रजिस्ट्रेशन

अमरनाथ यात्रेसाठी तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने रजिस्ट्रेशन करु शकता.

registaration | Ai Generator

ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसे करावे?

ऑनलाइन रजिस्ट्रेशनसाठी श्री अमरनाथजी श्राइन बोर्ड (SASB) च्या अधिकृत वेबसाइट jksasb.nic.in ला भेट द्या. या वेबसाइटवर यात्रा परमिट रजिस्ट्रेशन बटणवर क्लिक करा.

registaration | google

माहिती भरा

यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल, ज्यामध्ये प्रवासाचा मार्ग, प्रवासाची तारीख, प्रवाशाची संपूर्ण माहिती आणि वैद्यकीय माहिती भरावी लागेल.

registaration | yandex

डॉक्युमेन्टस

यानंतर, तुम्हाला तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो, ओळखपत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्राची डिजिटल कॉपी म्हणजेच प्रत अपलोड करावी लागेल. यानंतर, तुम्हाला पेमेंट पर्याय दिसेल. ते पूर्ण केल्यानंतर तुम्ही तुमचा प्रवासाचा पास डाउनलोड करू शकाल.

registaration | google

ऑफलाइन रजिस्ट्रेशन

श्री अमरनाथजी श्राइन बोर्ड (SASB) ने देशभरातील 533 बँक शाखांना ऑफलाइन रजिस्ट्रेशनसाठी अधिकृत केले आहे. पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, जम्मू आणि काश्मीर बँक आणि येस बँक सारख्या अनेक शाखा आहेत.

registaration | google

पास

येथे तुम्हाला KYC आणि हेल्थ सर्टिफिकेट सादर करावे लागेल आणि पैसे द्यावे लागतील. त्यानंतर तुम्हाला प्रवासासाठी पास मिळेल.

registaration | google

NEXT: 400 रुपयांमध्ये 400GB डेटा, धमाकेदार ऑफर

Mobile | freepik
येथे क्लिक करा