ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बीएसएनएल युजर्ससाठी कंपनीने एक मोठी घोषणा केली आहे.
बीएसएनएलच्या या स्वस्त डेटा पॅकची ऑफर २८ जून ते १ जुलै २०२५ पर्यंत मर्यादित होती.
परंतु, आता बीएसएनएलने त्यांच्या फ्लॅश सेलची शेवटची तारीख ७ जुलैपर्यंत वाढवली आहे. या सेलमध्ये, युजर्सला अतिशय परवडणाऱ्या किमतीत डेटा उपलब्ध होणार आहे.
या ऑफरमध्ये युजर्सना फक्त ४०० रुपयांमध्ये ४०० जीबी डेटा मिळणार आहे. म्हणजेच १ जीबी डेटा फक्त १ रुपयांमध्ये मिळेल.
हाय-स्पीड ४जी नेटवर्कसह हा डेटा स्वस्त डेटा पॅक ४० दिवसांच्या वैधतेसह येईल.
कंपनीने असेही म्हटले आहे की, बीएसएनएलने देशात ९०,००० हून अधिक ४जी नेटवर्क टॉवर्स उभारले आहेत.
कंपनीने म्हटले आहे की, युजर्स बीएसएनएल वेबसाइट किंवा बीएसएनएल सेल्फ केअर अॅपला भेट देऊन या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.