PF Balance Check: आता इंटरनेटशिवायही काही सेकंदात पीएफ बॅलन्स चेक करु शकता, कसं? वाचा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पीएफ बॅलन्स

जर तुमच्या जवळ स्मार्टफोन किंवा इंटरनेट नसेल तरी सुद्धा अवघ्या काही सेकंदात तुम्ही मिस्ड कॉल, एसएमएस किंवा व्हॉट्सअॅपच्या मदतीने तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातील बॅलन्स काही सेकंदात जाणून घेऊ शकता.

Pf | yandex

एसएमएस SMS

EPFO सदस्य SMS द्वारे पीएफ बॅलन्सची माहिती मिळवू शकतात. यासाठी, तुम्हाला EPFO ईपीएफओमध्ये नोंदणीकृत म्हणजेच रजिस्टर्ड असलेल्या मोबाईल नंबरवरून EPFOHO UAN HIN या फॉरमॅटमध्ये SMS पाठवावा लागेल. UAN हा युनिवर्सल अकाउंट नंबर आहे. HIN भाषा दर्शवते

Pf | yandex

या नंबरवर एसएम पाठवा

पीएफ बॅलन्स चेक करण्यासाठी तुम्हाला ७७३८२९९८९९ या नंबरवर मेसेज पाठवावा लागेल. काही सेकंदात, तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातील बॅलन्सची माहिती एसएमएसद्वारे पाठवली जाईल.

Pf | yandex

भाषा

ही सेवा १० पेक्षा जास्त हिंदी, इंग्रजी, पंजाबी, गुजराती, मराठी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, बंगाली भाषांमध्ये उपलब्ध आहे. जर तुमचा मोबाईल नंबर नोंदणीकृत नसेल किंवा यूएएन अॅक्टिव्हेट नसेल, तर एचआर किंवा कंपनीची मदत घ्या.

Pf | yandex

मिस्ड कॉल

मिस्ड कॉलद्वारे पीएफ बॅलन्स चेक करण्यासाठी तुम्हाला ९९६६०४४४२५ वर मिस्ड कॉल करावा लागेल. यासाठी तुमचा मोबाईल नंबर ईपीएफओकडे नोंदणीकृत असावा आणि यूएएन अॅक्टिव्हेटेड पाहिजे. या नंबरवर कॉल करताच, कॉल आपोआप डिस्कनेक्ट होईल आणि तुम्हाला एसएमएसद्वारे पीएफ बॅलन्सची माहिती मिळेल.

Pf | yandex

व्हॉट्सअॅप

व्हॉट्सअॅपद्वारे पीएफ बॅलन्सची माहिती मिळवण्यासाठी तुमच्या प्रादेशिक ईपीएफओ कार्यालयाचा व्हॉट्सअॅप नंबर सेव्ह करा. चॅटमध्ये “हाय” किंवा “पीएफ बॅलन्स” लिहा. थोड्याच वेळात, तुमचा पीएफ बॅलन्स ईपीएफओ कडून पाठवला जाईल.

Pf | freepik

ईपीएफओ नंबर

प्रादेशिक ईपीएफओ नंबर मिळवण्यासाठी या लिंकवर जा. https://www.epfindia.gov.in/site_en/Contact_us.php

Pf | ai

NEXT: सतत थकवा जाणवतोय, असू शकतं 'हे' गंभीर आजार

Weakness | yandex
येथे क्लिक करा