Diabetes risk in India  saam tv
लाईफस्टाईल

Diabetes in India: देशात वाढतोय मधुमेहाचा धोका; 10 पैकी 4 जण अनभिज्ञपणे जगतायत या आजारासोबत

Undiagnosed diabetes: एका अहवालानुसार, भारतातील १०.१ कोटी लोकांना मधुमेह आहे आणि त्याहूनही धक्कादायक गोष्ट म्हणजे ४ पैकी १ व्यक्तीला हा आजार आहे याची कल्पनाही नसते.

Surabhi Jayashree Jagdish

  • प्रत्येक 10 पैकी 4 मधुमेह रुग्णांना आजारी असल्याची जाणीव नाही.

  • 45 वर्षे वयावरील 20 टक्के लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत.

  • शहरी भागात मधुमेहाचे प्रमाण ग्रामीण भागापेक्षा दुप्पट आहे.

आपल्या देशात अनेक आजार असे आहेत जे हळूहळू शरीरात घर करून आपली तब्येत बिघडवत जातात. मधुमेह म्हणजेच डायबिटीज हा त्यापैकीच एक आजार आहे. अनेक वेळा लोक हा आजार गंभीरतेने घेत नाहीत जोपर्यंत तो एखादी मोठी समस्या निर्माण होते.

नुकतंच लॅन्सेट या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका नव्या अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. याध्ये भारतातील प्रत्येक 10 मधून सुमारे 4 मधुमेह रुग्णांना स्वतःलाच हे माहित नाही की त्यांना हा आजार आहे.

अभ्यासातून उघड झाली मोठी बाब

हा अभ्यास 2017 ते 2019 दरम्यान, 45 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांवर करण्यात आला. यात दिसून आलंय की, या वयोगटातील सुमारे 20 टक्के लोक मधुमेहाने त्रस्त आहेत. पुरुष आणि महिलांमध्ये हा टक्का जवळपास सारखाच आहे.

याशिवाय शहरी भागात मधुमेहाचे रुग्ण ग्रामीण भागाच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहेत. तज्ज्ञांच्या मते, जीवनशैलीतील फरक, आहारातील बदल आणि शारीरिक हालचालींचा अभाव ही यामागची मोठी कारणं आहेत.

भारताची धोकादायक स्थिती

20 ते 79 वयोगटातील प्रौढांमध्ये भारत मधुमेह रुग्णसंख्येत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2019 मध्ये देशात झालेल्या एकूण मृत्यूपैकी सुमारे 3% मृत्यू मधुमेहामुळे झाले. याशिवाय, उच्च रक्तदाबाचे रुग्ण देखील झपाट्याने वाढत आहेत. हे दोन्ही आजार वेळेवर ओळखले नाहीत आणि नियंत्रित केलं नाहीत, तर हृदय, किडनी आणि डोळ्यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांवर गंभीर परिणाम होऊ शकतो.

अभ्यासात असेही आढळून आलंय की, ग्रामीण भागात मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या उपचारांची सुविधा अत्यंत अपुरी आहे. ICMR आणि WHO यांनी सात राज्यांतील 19 जिल्ह्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून धक्कादायक बाबी समोर आल्यात.

  • फक्त 40% सब-सेंटर्स हे या आजारांच्या उपचारासाठी सज्ज असल्याचं समोर आलंय.

  • एक-तृतीयांश केंद्रांमध्ये डायबिटीजवरील मेटफॉर्मिन ही औषधच उपलब्ध नव्हती.

  • जवळपास निम्म्या (45%) केंद्रांमध्ये उच्च रक्तदाबावरील अ‍ॅम्लोडिपिन या औषधाची कमतरता होती.

वेळीच खबरदारी आणि तपासणी आवश्यक

मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे दोन्ही आजार नियमित तपासणी, योग्य आहार, व्यायाम आणि वेळेवर औषध घेऊन सहज नियंत्रणात ठेवता येतात. सुरुवातीपासूनच काळजी घेतल्यास आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार केल्यास, यामुळे होणारे गंभीर नुकसान टाळता येऊ शकते.

भारतातील मधुमेह रुग्णांपैकी किती टक्के लोकांना आजाराबद्दल माहिती नाही?

प्रत्येक 10 मधून सुमारे 4 म्हणजे 40% रुग्णांना मधुमेह आहे हे माहीत नाही.

2017 ते 2019 च्या अभ्यासात कोणत्या वयोगटाचा समावेश करण्यात आला होता?

45 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांचा समावेश अभ्यासात करण्यात आला होता.

शहरी भागात मधुमेहाचे प्रमाण ग्रामीण भागापेक्षा किती जास्त आहे?

शहरी भागात मधुमेहाचे प्रमाण ग्रामीण भागापेक्षा जवळपास दुप्पट आहे.

ग्रामीण स्वास्थ्य केंद्रांमध्ये मधुमेहाच्या उपचारासाठी कोणते महत्त्वाचे औषध अनुपलब्ध आहे?

एक-तृतीयांश केंद्रांमध्ये मेटफॉर्मिन हे मधुमेहाचे महत्त्वाचे औषध अनुपलब्ध आहे

मधुमेह आणि उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी कोणते उपाय प्रभावी आहेत?

नियमित तपासणी, योग्य आहार, व्यायाम आणि वेळेवर औषध घेणे हे उपाय प्रभावी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक भरती आणि ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा मुख्य सूत्रधाराच्या आवळल्या मुसक्या|VIDEO

Sangmeshwar Amba Ghat : संगमेश्वर-आंबा घाट मार्गावर दरड कोसळली, वाहतूक पूर्णत: ठप्प; कोकणात जाणाऱ्यांचे हाल

Viral Video: आधी कानाखाली मारली नंतर उचलून आपटल; उधारीवरून ग्राहक अन् दुकानदाराचं भांडण पेटलं, Video व्हायरल

Maharashtra Live Update: पुण्यातील बॉलर पबवर गुन्हा दाखल

Raj Kundra Video: "माझी एक किडनी तुमच्या नावावर..."; शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याचं वचन, प्रेमानंद महाराज भावुक

SCROLL FOR NEXT