Liver cancer warning signs SAAM TV
लाईफस्टाईल

Liver cancer warning signs: लिव्हरचा कॅन्सर होण्यापूर्वी शरीर देतं ४ संकेत; लक्षणं समजताच डॉक्टरांची मदत घ्या

Liver cancer : शरीर काही गंभीर आजार होण्यापूर्वी त्याची लक्षणं दाखवतं. तज्ज्ञांच्या मते लिव्हरच्या कॅन्सरपूर्वी आधी शरीर चार महत्त्वाचे संकेत देत. ही लक्षणं दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल चुकीच्या जीवनशैली अनेक गंभीर आजार आपल्या मागे लागलेत. यातीलच एक आजार म्हणजे कॅन्सर...सध्या केवळ वयस्कर व्यक्तींना नव्हे तर तरूणांना देखील या कॅन्सरचं निदान होतंय. यातीलच एक कॅन्सर म्हणजे लिव्हर कॅन्सर. लिव्हर कॅन्सर हा सर्वात धोकादायक कॅन्सर असून सुरुवातीच्या टप्प्यात त्याची लक्षणं दिसून येत नाहीत. त्यामुळे अनेक लोक ही लक्षणं गॅस, अॅसिडिटी किंवा साधा अशक्तपणा समजून दुर्लक्ष करतात.

लिव्हर हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव मानला जातो. रक्त शुद्ध करणं, शरीरातील टॉक्सिन घटक बाहेर टाकणं, पचनक्रिया सुरळीत ठेवणं ही अनेक आवश्यक कामं तो करतो. तज्ज्ञांच्या मते, लिव्हर कॅन्सरचा सर्वात मोठा धोका म्हणजे त्याची सुरुवातीची लक्षणं स्पष्ट दिसत नाहीत. याची नेमकी लक्षणं काय आहेत ती जाणून घेऊया.

लिव्हर कॅन्सरची सुरुवात कशी ओळखाल?

लिव्हर आपल्या शरीराच्या उजव्या बाजूला असतं. त्यामुळे त्याच्या कार्यात बिघाड झाला तर त्या भागात वेदना, जडपणा किंवा आतल्या बाजूने खेचल्यासारखं वाटू लागतं. या वेदना सतत राहिल्या किंवा वाढत गेल्या तर ती लिव्हर कॅन्सरची सुरुवात असू शकते.

वजन कमी होणं

तुम्ही डाएट किंवा व्यायाम करत नसतानाही वजन झपाट्याने कमी होत असेल तर ते लिव्हर कॅन्सरचं लक्षणं असू शकतं. ट्यूमर शरीरातील ऊर्जा वेगाने कमी करतो त्यामुळे कोणताही प्रयत्न न करता वजन घटू लागतं.

भूक कमी लागणं

भूक कमी लागणं किंवा थोडेसं खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटणे हे लिव्हरच्या कॅन्सरचं एक लक्षण मानलं जातं. यामुळे तुमची खाण्याची इच्छा कमी होते आणि कमी जेवल्यानंतरही पोट भरल्यासारखं वाटतं.

बिलीरुबिनचे प्रमाण वाढतं

लिव्हर खराब झाल्यावर बिलीरुबिनचे प्रमाण वाढतं. यामुळे डोळे आणि त्वचा पिवळी दिसू लागते. कावीळ अचानक झाली आणि बराच काळ राहिली तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. हे लिव्हर कॅन्सरचे गंभीर लक्षण असू शकतं.

थकवा

लिव्हर नीट काम करत नसेल तर शरीराला योग्य प्रमाणा ऊर्जा मिळत नाही. त्यामुळे सतत थकवा, अशक्तपणा आणि सुस्ती जाणवू लागते. आराम केल्यानंतरही न जाणारा थकवा हा कॅन्सरचा इशारा असू शकतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT