Surya Grahan 2026 GOOGLE
लाईफस्टाईल

Surya Grahan 2026: ग्रहणापूर्वी करा ही 4 कामं, अन्यथा वर्षभर होईल नुकसान; 'या' राशीवर होईल गंभीर परिणाम, वेळीच व्हा सावध

Surya Grahan 2026 Date in India: १७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या कंकणाकृती सूर्यग्रहणाचा कुंभ राशीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. ग्रहणापूर्वी काही उपाय आणि सावधगिरी बाळगल्यास नकारात्मक प्रभाव कमी होण्यास मदत होईल.

Sakshi Sunil Jadhav

वर्षाच्या पहिल्या सूर्यग्रहणाची सगळ्यांनात उत्सुतकता असते. यंदा सुर्यग्रहण शास्त्रज्ञांच्या मते, १७ फ्रेब्रुवारी २०२६ रोजी मंगळवारी असणार आहे. हे कंकणाकृती ग्रहण असणार आहे. ज्याला रिंग ऑफ फायर म्हंटले जाते. यामध्ये चंद्र सुर्याला पूर्णपणे झाकत नाही. याने त्याच्या काठावर प्रकाशाचे वलय पाहायला मिळते. म्हणजेच त्याच्या भोवती एक चमकदार कडा पाहायला मिळते. ही दृश्य तुम्ही सहज उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही.

सुर्यग्रहणाची वेळ ही दुपारी ३ वाजून २६ मिनिटांनी सुरु होणार आहे. ग्रहणाचा मध्य हा संध्याकाळी ५ वाजून ४२ मिनिटांनी असेल. तर ग्रहणाची समाप्तीही संध्याकाळी ६.५७ वाजता होणार आहे. हे ग्रहण ज्योतिशास्त्रात खूप महत्वाचे मानले जाते. हे ग्रहण भारतात पाहता येत नसलं तरी त्याचा ज्योतिषीय परिणाम सर्व राशींवर जाणवू शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. मात्र भारतात ग्रहण दिसणार नसल्याने सूतक कालाचे कडक नियम लागू होणार नाहीत आणि मंदिरांची दारही बंद राहणार नाहीत. असे महत्वाचे नियम आणि अटी आपण पुढील माहितीत जाणून घेणार आहोत.

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहणाच्या काळात वातावरणात सूक्ष्म बदल होतात. त्यामुळे ग्रहण सुरू होण्यापूर्वी घरातले दूध, दही, शिजवलेले अन्न आणि पिण्याच्या पाण्यात तुळशीची पानं टाकण्याची प्रथा असते. तुळशीमध्ये शुद्धीकरणाचे गुणधर्म असल्याचे मानले जाते. विज्ञानाच्या दृष्टीने पाहता, अन्न झाकून ठेवणं आणि स्वच्छता राखणं जास्त महत्त्वाचं आहे.

गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणे गरजेचे मानले जाते. जरी ग्रहण भारतात दिसणार नसले तरी मानसिक शांतता आणि सुरक्षिततेसाठी सावधगिरी बाळगावी. धारदार वस्तूंचा वापर टाळावा, अनावश्यक ताण न घेणं आणि सकारात्मक विचार ठेवणे योग्य ठरेल. काहीजण या काळात मंत्रजप किंवा प्रार्थना करणे पसंत करतात, त्याने मानसिक स्थैर्य मिळतं.

ज्योतिषीय गणनेनुसार हे ग्रहण कुंभ राशीत होत असून सूर्य आणि राहू यांच्या युतीमुळे ‘ग्रहण योग’ निर्माण होत आहे. याचा परिणाम व्यक्तीच्या स्वभावावर आणि निर्णयक्षमतेवर होऊ शकतो. त्यामुळे या काळात वादविवाद टाळा, रागावर नियंत्रण ठेवा आणि मोठे आर्थिक व्यवहार पुढे ढकला.

ग्रहणाचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी दानधर्म करण्याची परंपरा आहे. ग्रहण सुरू होण्यापूर्वी गूळ, मसूर डाळ किंवा काळे तीळ वेगळे काढून ठेवून ग्रहणानंतर स्नान करून गरजू व्यक्तींना दान दिल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते, अशी श्रद्धा आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ruchak Yog: 11 मे रोजी मंगळाच्या गोचरने बनणार रूचक राजयोग; या ३ राशी अचानक होणार गडगंज श्रीमंत

Maharashtra News Live Update: बनेश्वर क्षेत्रातील मधमाशांचा वाढता धुमाकूळ, भाविकांच्या जीवितास धोका

ठाणे रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांची गर्दी कमी होणार; मोदी सरकारने घेतला गेमचेंजर निर्णय

कृषिप्रधान देशाचा कणा अक्षरशः रडला! कांद्याला भाव किलोला फक्त ५० पैसे, ७३ पोती विकली, हातात आले ४०० रुपये

Kidney health: तुमच्या दररोजच्या या ६ सवयी किडनीला करतायत निकामी!

SCROLL FOR NEXT