Amravati Crime : दफन केलेला तरुणाचा मृतदेह २३ दिवसांनी पुन्हा थडग्याबाहेर काढला; धक्कादायक आलं समोर?

Melghat youth Death Mystery: मेळघाटातील धारणी तालुक्यातील लवादा गावात, एका तरुणाचा मृतदेह दफन केल्यानंतर २३ दिवसांनी पुन्हा बाहेर काढण्यात आला. ५ जुलै २०२६ रोजी हा तरुण कोसळून मरण पावला होता आणि सुरुवातीला त्याच्या कुटुंबीयांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला होता.
Melghat youth Death Mystery:
MELGHAT MYSTERY: YOUTH’S BODY EXHUMED 23 DAYS AFTER BURIAL IN DHARNIsaam tv
Published On
Summary

मेळघाटात २३ दिवसांनी मृतदेह थडग्यातून बाहेर काढला

धारणी तालुक्यात तरुणाच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण

लवादा गावातील तरुणाचा मृतदेह पुन्हा का काढला

मेळघाटातील धारणी तालुक्यातील लवादा गावात एक ५ जुलै २०२६ रोजी एक तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर २३ दिवसांनी दफन केलेला तरुणाचा मृतदेह थडग्यातून बाहेर काढण्यात आलाय. या धक्कादायक प्रकरणाने खळबळ उडालीय. थडग्यातून मृतदेह पुन्हा का काढण्यात आला.? यामागील कारण काय?

Melghat youth Death Mystery:
Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

हाती आलेल्या ५ जुलै २०२६ रोजी एका तरुणाचा मृत्यू झाला होता. तरुणाला गावात चक्कर येऊन तो खाली पडला होता. त्यानंतर त्याला तातडीने धारणी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.मात्र रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.त्यावेळी डॉक्टरांनी शवविच्छेदनकरण्याचा सल्ला दिला होता. मात्र,मृताच्या नातेवाईकांनी पोस्टमार्टम करण्यास नकार देत मृतदेह ताब्यात घेऊन गावात दफनविधी केला. आता याप्रकरणाला मोठा ट्वि्स्ट आलाय. तब्बल २३ दिवसांनी तरुणाचा मृतदेह थडग्यातून बाहेर काढण्यात आला.

Melghat youth Death Mystery:
Bribe Case : जालन्यात खळबळ! अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; असे अडकले जाळ्यात

मोबाईलवरील चॅटिंगनं संशय वाढला?

मृत्यू झालेल्या तरुणाचा मोबाईल कुटुंबियांच्या हाती लागला. त्यात त्यांनी काही चॅटिंग दिसली. त्यावरून संबंधित तरुणाचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यांची हत्या झाल्याचा संशय कुटुंबियांच्या मनात आला. कुटुंबियांनी गावातील काही व्यक्तींवरही संशय घेतला. त्यानुसार त्यांनी २५ जुलै २०२६ रोजी धारणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Melghat youth Death Mystery:
बॉयफ्रेंडसोबत बोलताना रडायचा मुलगा; निर्दयी मायनं ३ वर्षाच्या लेकाचा दाबला गळा

तक्रारीनंतर पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तहसीलदार शेवाले यांच्या उपस्थितीत दफन केलेला मृतदेह बाहेर काढून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. शवविच्छेदन आणि इतर वैद्यकीय तपासणीनंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास धारणी पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com