Mahashivratri 2026: भगवान शंकराला एकूण किती नावे आहेत?

Sakshi Sunil Jadhav

पवित्र दिवस

महाशिवरात्री १५ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्रभर साजरी केली जाणार आहे. हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो.

108 names of Lord Shiva

शिव पुराणांमधील गोष्ट

शिव पुराणामध्ये भगवान शिवाच्या विविध रूपांचे आणि गुणांचे वर्णन केलेले आढळते. यातच एक रंजक गोष्ट म्हणजे भगवान शंकराची नावे आहे. याबद्दल अनेकांना प्रश्न पडत असतो. आपण त्यांची एकूण किती नावे आहेत याबद्दल जाणून घेऊयात.

108 names of Lord Shiva

भगवान शंकरांची नावे

हिंदू धर्मात 108 ही संख्या पवित्र मानली जाते. जपमाळेत 108 मणी असतात आणि शिवनामस्मरणातही 108 नावांचा जप विशेष फलदायी मानला जातो. त्याचप्रमाणे शिव शंकराचीही एकूण 108 नावे आहेत.

Shiva name significance

शिव म्हणजे त्रिदेवांपैकी एक

Brahma, Vishnu आणि Shiva या त्रिदेवांमध्ये शिव परिवर्तनाचे प्रतीक आहेत.

Mahashivratri 2026

आशुतोष ते महादेव

‘आशुतोष’ म्हणजे लगेच प्रसन्न होणारे, तर ‘महादेव’ म्हणजे देवांतील देव. या नावांतून शिवाची करुणामय आणि सर्वोच्च अशी दोन्ही रूपं दिसतात.

Mahashivratri 2026

नीलकंठ नावामागची कथा

समुद्रमंथनावेळी विष प्राशन करून कंठ निळा झाल्यामुळे त्यांना ‘नीलकंठ’ म्हणतात. हे त्याग आणि विश्वरक्षणाचे प्रतीक आहे.

Mahashivratri 2026

पशुपती आणि भूतनाथ

सर्व जीवसृष्टीचे पालनकर्ता म्हणून शिवाला ‘पशुपती’ म्हटले जाते. तसेच पंचमहाभूतांचे स्वामी म्हणून ‘भूतनाथ’ हे नाव प्रसिद्ध आहे.

Mahashivratri 2026

योग आणि ध्यानाचे अधिपती

आदियोगी आणि महायोगी ही नावे शिवाच्या ध्यानमग्न, तपस्वी स्वरूपाचे दर्शन घडवतात. योगशास्त्राचे जनक म्हणूनही त्यांची ओळख आहे.

Mahashivratri 2026

नटराज रूपातील शिव

‘नटराज’ या नावातून सृष्टी, स्थिती आणि संहार यांचा ताल दर्शवणारा तांडव नृत्य करणारा शिव दर्शवला जातो.

Mahashivratri 2026

NEXT: Crispy Onion Rings: ब्रेडक्रम्ब्सशिवाय खुसखुशीत ऑनियन रिंग्स; घरच्या घरी करा सोपी रेसिपी

Crispy Onion Rings Recipe
येथे क्लिक करा