मुगाची डाळ टाकून टाकळ्याची भाजी कशी बनवायची? सोपी रेसिपी

Manasvi Choudhary

टाकळ्याची भाजी

पावसाळ्यात टाकळ्याच्या भाजीला मागणी असते. गावरान स्टाईल टाकळ्याची भाजी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Takla Bhaji

सोपी रेसिपी

मुगाची डाळ टाकून तुम्ही सोप्या पद्धतीने टाकळ्याची भाजी बनवू शकता.

Takla Bhaji

साहित्य

भाजी बनवण्यासाठी टाकळा, मुग डाळ, कांदा, हिरवी मिरचीस लसूण, ओले खोबरे, हळद, मीठ हे साहित्य घ्या.

Takla Bhaji Recipe

टाकळ्याची पाने स्वच्छ धुवून घ्या

भाजी बनवण्यासाठी सर्वातआधी टाकळ्याची पाने स्वच्छ धुवून गॅसवर एका पातेल्यामध्ये गरम पाण्यात उकळवून घ्या.

Takla Bhaji Recipe

फोडणी द्या

गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये लसूण चांगला परतून घ्या. नंतर त्यात हिरवी मिरची आणि कांदा चांगला परतून घ्या.

Takla Bhaji Recipe

भाजी शिजवून घ्या

कांदा गुलाबी झाल्यानंतर त्यात भिजवलेली मुगाची डाळ मिक्स करा. मिश्रणात हळद मिक्स करून मिश्रण शिजवून घ्या.

Takla Bhaji Recipe

टाकळ्याची भाजी मिक्स करा

या मिश्रणात उकडून घेतलेली टाकळ्याची भाजी मिक्स करा. भाजी एकत्र करा नंतर त्यात चवीनुसरा मीठ मिक्स करा आणि वाफेवर भाजी शिजवण्यासाठी झाकण ठेवा.

Takla Bhaji Recipe

खोबऱ्याचा किस मिक्स करा

भाजी शिजली की त्यात खोबऱ्याचा किस मिक्स करा. अशाप्रकारे घरच्या घरी टाकळा भाजी तयार होईल.

Takla Bhaji Recipe

NEXT: मेथीच्या भाजीपासून बनवा कुरकुरीत भजी, चविष्ट आहे रेसिपी

येथे क्लिक करा...