Manasvi Choudhary
संध्याकाळी चहासोबत गरमागरम भजी खाण्याची मज्जाच काही वेगळी असते. तुम्ही देखील नेहमीची कांदाभजी, बटाटाभजी खाऊन कंटाळा आला असेल तर मेथीची भजी ट्राय करा.
मेथीची भजी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही सोप्या पद्धतीने ही रेसिपी ट्राय करू शकता.
मेथीची भजी बनवण्यासाठी मेथीची पाने, बेसन, तांदळाचे पीठ, कांदा, हिरवी मिरची. आलं- लसूण पेस्ट, ओवा, हळद, मसाला, मीठ, तेल हे साहित्य घ्या.
मेथीची भजी बनवण्यासाठी सर्वातआधी मेथीची कोवळी पाने स्वच्छ निवडून बारीक कापून घ्या.
नंतर एका भांड्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट, ओवा, हळद, तिखट आणि चवीनुसार मीठ हे सर्व साहित्य मिक्स करा.
नंतर या मिश्रणात संपूर्ण मिश्रण चांगले एकजीव करा. मेथीमध्ये हे मिश्रण चांगले मिक्स करा.
नंतर मिश्रणात थोडे पाणी मिक्स करा. मिश्रण जास्त घट्ट किंवा पातळ होणार नाही याची काळजी घ्या. मिश्रण पातळ झाले तर त्यात बेसनचे पीठ मिक्स करा.
गॅसवर गरम तेलामध्ये भजीचे मिश्रण सोडा. गॅस मध्यम आचेवर ठेवून भजी दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.