Sakshi Sunil Jadhav
सध्या डिजिटल युग सुरु आहे. स्मार्टफोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोबाईल आपल्यासोबत असतो.
सोशल मीडिया, गेम्स, ई-मेल्स आणि सततच्या नोटिफिकेशन्समुळे मेंदूला क्षणभरही विश्रांती मिळत नाही. पण जर तुम्ही पूर्ण एक महिना मोबाईल वापरणं बंद केलं तर काय होईल? जाणून घ्या तज्ज्ञांच्या मते होणारे ७ महत्त्वाचे बदल.
सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्स आणि बातम्यांमुळे मेंदूवर ताण वाढतो. मोबाईलपासून दूर राहिल्यावर मन शांत होतं आणि टेन्शन कमी होतं.
मोबाईलच्या स्क्रीनमधून निघणारा ब्लू लाईट शरीराच्या नैसर्गिक झोपेच्या चक्रात अडथळा आणतो. महिनाभर फोन न वापरल्याने झोप पटकन लागते आणि गाढ झोप मिळते.
जास्त स्क्रीन टाइममुळे डोळ्यांत कोरडेपणा, जळजळ आणि डोकेदुखी होऊ शकते. फोनपासून लांब राहिल्यावर डोळ्यांना आराम मिळतो आणि दृष्टी सुरक्षित राहते.
मोबाईलवर वेळ घालवण्याऐवजी चालणे, व्यायाम करणे किंवा बाहेर वेळ घालवणे वाढते. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते आणि फिटनेस सुधारतो.
मोबाईल हा सततचा व्यत्यय आहे. तो दूर ठेवल्याने लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता वाढते आणि कामं जास्त कार्यक्षमतेने पूर्ण होतात.
ऑनलाईन संवादाऐवजी प्रत्यक्ष भेटीगाठी वाढतात. कुटुंब आणि मित्रांसोबतचा वेळ जास्त अर्थपूर्ण ठरतो.
सततच्या डिजिटल माहितीपासून दूर राहिल्यास मेंदूला विश्रांती मिळते. यामुळे स्मरणशक्ती आणि निर्णयक्षमता सुधारते.