Surya Grahan 2024, Surya Grahan 2024 Date Saam Tv
लाईफस्टाईल

Surya Grahan 2024 : सूर्यग्रहणामुळे या ५ राशी होतील मालामाल! काहींचे टेन्शन वाढणार, वाचा १२ राशींचे राशीफल

Surya Grahan 2024 Date : एप्रिल महिन्यात फाल्गुन अमावास्येला वर्षातले पहिले सूर्यग्रहण असणार आहे. यंदा सूर्यग्रहण हे ८ एप्रिल २०२४ ला असणार आहे. चैत्र नवरात्रीच्या एक दिवसाआधी सूर्यग्रहण असणार आहे.

कोमल दामुद्रे

Surya Grahan 2024 Rashi Bhavishya In Marathi:

एप्रिल महिन्यात फाल्गुन अमावास्येला वर्षातले पहिले सूर्यग्रहण असणार आहे. यंदा सूर्यग्रहण हे ८ एप्रिल २०२४ ला असणार आहे. चैत्र नवरात्रीच्या एक दिवसाआधी सूर्यग्रहण असणार आहे.

सूर्यग्रहणाला ज्योतिषशास्त्रात आणि वैज्ञानिकदृष्ट्या अधिक महत्त्व असणार आहे. या ग्रहणांचा अनेक राशींवर शुभ-अशुभ परिणाम पाहायला मिळेल. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. १२ राशींसाठी (Rashi) सूर्यग्रहण कसे असेल जाणून घेऊया

1. मेष

सूर्यग्रहणामुळे आत्मविश्वासाची कमतरता राहिल. शैक्षणिक कार्यावर लक्ष केंद्रित कराल. नोकरीत (Job) बदल होण्याची शक्यता आहे. मित्रांकडून सहकार्य मिळेल.

2. वृषभ

सूर्यग्रहणामुळे वृषभ राशीला फायदा होईल. आत्मविश्वास वाढेल. आत्मसंयम ठेवा. नोकरीत प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी बदल होऊ शकतात.

3. मिथुन

आरोग्याबाबत (Health) काळजी घ्या. मन अस्वस्थ राहिल. कामाच्या ठिकाणी आत्मविश्वास वाढेल. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. व्यवसायातून उत्पन्न वाढेल.

4. कर्क

बोलण्यात गोडवा राहिल. संयम राखण्याचा प्रयत्न करा. कामात व्यस्त रहाल. अधिक धावपळ होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.

5. सिंह

मन अस्वस्थ होऊ शकते. स्वत:वर नियंत्रण ठेवा. भावनांवर नियंत्रण ठेवा. वाणीचा प्रभाव वाढेल. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल.

6. कन्या

आत्मविश्वास वाढेल. अतिउत्साही होणे टाळा. उत्पन्नाची साधणे वाढतील. मनात शांती आणि आनंद राहिल.

7. तुळ

कोणतीही गोष्ट करताना धीर धरा. मनात एखाद्या गोष्टीमुळे चढ-उताराची भावना राहिल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. उच्च पद प्राप्त होईल. कार्यक्षेत्रात वाढ होईल. अतिरिक्त खर्च होईल. कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या.

8. वृश्चिक

मन प्रसन्न राहिल. काम करताना संयम बाळगावा लागेल. जवळचा मित्र भेटण्याची शक्यता आहे. मित्राकडून नवीन कामाची संधी मिळेल. अधिक मेहनत करावी लागेल.

9. धनु

सूर्यग्रहणामुळे आत्मविश्वास अधिक दृढ होईल. शैक्षणिक कार्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. प्रगतीच्या संधी मिळतील. कार्यक्षेत्रात वाढ होईल.

10. मकर

सूर्यग्रहणाच्या प्रभावामुळे आत्मविश्वासाची कमतरता निर्माण होईल. मन अस्वस्थ राहिल. संयम बाळगणे अति गरजेचे आहे. धर्माची आवड वाढेल. लेखन आणि बौद्धिक कार्यात व्यस्तता वाढेल. मित्रांकडून सहकार्य मिळेल.

11. कुंभ

अनावश्यक राग आणि वादविवाद टाळा. आपल्या आरोग्याबाबत जागरुक रहा. मित्राच्या मदतीने व्यवसाय वाढेल. उत्पन्नात वाढ होईल.

12. मीन

शैक्षणिक कार्यात यश मिळेल. लेखन आणि बौद्धिक कार्य उत्पन्नाचे स्त्रोत बनतील. कौटुंबिक जीवन आनंदी राहिल. लाभाच्या संधी मिळतील.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त नांदेड शहरातील श्री नरहरी नरसिंह मंदिरात विठ्ठल नामाचा गजर

Pune: पंढरीच्या वाटेवर लुटमार अन् अल्पवयीन मुलीचे लचके तोडले; पोलिसांनी २ आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Shahada Police : प्रायव्हेट खोल्या, सोफ्यावर कंडोम; शहाद्यात अवैध कॅफेवर पोलिसांचा छापा

अमेरिकेत पुराचा हाहाकार! 50 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; पाहा VIDEO

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

SCROLL FOR NEXT