Surya Grahan 2024 : वर्षातले पहिले सूर्यग्रहण कधी आणि कुठे दिसणार? जाणून घ्या

Surya Grahan 2024 Date in India : वर्षातील पहिले सूर्यग्रहण एप्रिल महिन्यात असणार आहे. पंचांगानुसार फाल्गुन अमावास्येला म्हणजेच ८ एप्रिल २०२४ ला सूर्यग्रहण असणार आहे.
Surya Grahan 2024
Surya Grahan 2024Saam Tv
Published On

Solar eclipse 2024 :

वर्षातील पहिले सूर्यग्रहण एप्रिल महिन्यात असणार आहे. पंचांगानुसार फाल्गुन अमावास्येला म्हणजेच ८ एप्रिल २०२४ ला सूर्यग्रहण असणार आहे.

चैत्र नवरात्रीच्या एक दिवसाआधी सूर्यग्रहण असणार आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला विशेष महत्त्व आहे. ८ एप्रिलला वर्षातील पहिले सूर्यग्रहण असणार आहे. ५४ वर्षापूर्वी असा सूर्यग्रहणाचा योग आला होता. हे सूर्यग्रहण कुठे दिसणार आहे? याची वेळ (Time) कोणती? जाणून घेऊया.

1. सूर्यग्रहण आणि सुतक कालावधी

वर्षातील पहिले सूर्यग्रहण ८ आणि ९ एप्रलिच्या मध्यरात्री असणार आहे. त्याचा कालावधी ८ एप्रिल रोजी रात्री ९.१२ मिनिटे ते पहाटे १.२५ मिनिटांपर्यंत राहणार आहे. सूर्यग्रहणाचा सूतक कालावधी ग्रहण सुरु होण्याच्या १२ तास आधी सुरु होणार आहे.

Surya Grahan 2024
Rules Change In April 2024 : एप्रिल महिन्यापासून बदलणार हे ६ नियम, खिशाला बसणार कात्री!

2. वर्षातील पहिले सूर्यग्रहण कुठे दिसणार?

वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात (India) दिसणार नाही. त्यामुळे या ठिकाणी सुतक काळही वैध राहणार नाही. हे सूर्यग्रहण अलास्का, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका, आयर्लंडसह उत्तरेकडील भागात, इंग्लंड आणि कॅनडाचे काही वायव्य भाग सोडून संपूर्ण अमेरिकेत दिसणार आहे. वर्षातील पहिले सूर्यग्रहण मेक्सिकोतील माझाटियन शहरात (City) दिसणार आहे.

3. सूर्यग्रहणाची वेळ

सूर्यग्रहण रात्री ९.१२ वाजता सुरु होईल. तर मध्यरात्री ०१.२५ मिनिटांपर्यंत राहिल. हे सूर्यग्रहण ४ तास २५ मिनिटांपर्यंत असणार आहे. हे सूर्यग्रहण मीन राशी, स्वाती नक्षत्रात होईल. सुतक काळ सूर्यग्रहणाच्या १२ तास आधी सुरु होतो आणि ग्रहणानंतरही चालू राहतो. परंतु, हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com