तुमच्या रक्तातल्या साखरेची वाढली असेल घाबरून जाऊ नका. कारण सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे तुम्हाला अशा गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. बदललांमध्ये तुमच्या आहाराच्या बदलाकडे तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. कामानिमित्त बाहेर असल्यामुळे तुम्हाला खाण्याकडे लक्ष देता येत नसेल तर ती सवय तुमच्यासाठी घातक ठरू शकते. त्याने डायबेटीज किंवा प्री डायबेटीजचा धोका सुद्धा वाढू शकतो.
तज्ज्ञांच्या मते तुम्ही तुमच्या सकाळच्या नाश्त्यातच योग्य पदार्थ खाल्ले पाहिजेत. ब्लड शुगरवर नियंत्रण ठेवलं नाहीतर तर तुमच्या किडनी, ह्रदय, स्नायू आणि डोळ्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजेच. पण त्यासोबत औषधोपचार आणि नियमित व्यायामासोबत काही नैसर्गिक उपाय केले पाहिजेत. त्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहायला मदत होईल.
ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन केले पाहिजे?
तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात कारल्याचा रस सेवन करू शकता. त्याने डायबेटीज नियंत्रणात येण्यास मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी कमी प्रमाणात कारल्याचा रस घेतल्याने त्याचा फायदा होऊ शकतो.
मेथीचे पाणीही रक्तातील साखर नियंत्रणासाठी फायदेशीर आहे. मेथीच्या बियांमध्ये इन्सुलिन वाढवणारे घटक असतात. रात्री भिजवलेल्या मेथीच्या बियांचं पाणी सकाळी प्यायल्याने साखरेचं अचानक वाढणारं प्रमाण नियंत्रित राहायला सुरुवात होते.
दालचिनीचा चहा हा आणखी एक सर्वात प्रभावी उपाय मानला जातो. दालचिनीमध्ये असलेले सिनामाल्डिहाइड ही संयुे शरीरातल्या इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारण्याचं काम करतात. जेवणानंतर दालचिनीचा चहा घेतल्यावर रक्तातल्या साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत होऊ शकते.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.