fitness after 40 google
लाईफस्टाईल

Fitness After 40 : चाळीशी ओलांडली? मग फिटनेस तपासण्यासाठी फक्त ४ व्यायाम ठरतील बेस्ट

Yoga And Workout : चाळीशी ओलांडल्यानंतर फिट राहणं आवश्यक आहे. प्लॅंक, पुश-अप्स, स्कॉट्स आणि कार्डिओ हे चार व्यायाम तुमची ताकद, सहनशक्ती व आरोग्य तपासण्यासाठी उपयुक्त ठरतील.

Sakshi Sunil Jadhav

वय वाढल्यावर सांधेदुखी, थकवा आणि सहनशक्ती कमी होण्याची शक्यता वाढते.

प्लॅंक, पुश-अप्स, स्कॉट्स आणि कार्डिओ तुमची ताकद व सहनशक्ती मोजायला मदत करतात.

व्यायामांमुळे आहार आणि दैनंदिन सवयींमध्ये आवश्यक ते बदल समजतात.

नियमित सरावाने शरीर मजबूत राहते, ऊर्जा वाढते आणि जीवनशैली निरोगी राहते.

वयाची चाळीशी ओलांडली की बऱ्याच जणांना सांधेदुखीच्या समस्या जाणवायला सुरुवात होते. वाढत्या वयानुसार हालचाली सुद्धा धिम्या गतीने व्हायला सुरुवात होते. तुम्ही अशावेळेस फिट राहणं अत्यंत आवश्यक असतं. कारण आयुष्यात चाळीशीचा टप्पा महत्वाचा मानला जातो.रोजची धावपळ, फॅमिलीचा सांभाळ आणि महत्वाचे म्हणजे नोकरी. यामुळे अनेकांना त्यांच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देता येत नाही. मग कमी वयातच त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागते. वयाच्या ४० व्या वर्षी शरीराची तंदुरुस्ती आणि सहनशक्ती जाणून घेणे महत्वाचे असते.

तुम्ही योग्य वेळी स्वत:च्या क्षमचा जाणून घेतल्याने तुम्हाला योग्य ती जीवनशैली सुधारता येते. तु्म्ही त्यामध्ये योग्य ते बदल करुन स्वत:ला फीट ठेवू शकता. त्यासाठी तुम्हाला ४ योगासने करुन पाहावी लागणार आहेत. त्याने तुम्हाला योग्य तो बदल जाणवेल.

प्लॅंक

प्लॅंक हा व्यायाम एकदा करुन पाहावा. त्याने तुमच्या कोअर स्नायू आणि सहनशक्तीची चाचणी करता येऊ शकते. १ मिनिटासाठी तुम्ही योग्य पोश्चरमध्ये राहून तुमचा फिटनेस लेवल पाहू शकता.

पुश-अप्स

पुश-अप्स हा सगळ्यांच्या परिचयाचा व्यायाम असणार आहे. तुमच्या शरीराच्या वरच्या भागाची आणि हाताची ताकद तुम्हाला या व्यायामातून कळेल. हा व्यायाम सुद्धा तुम्हाला १ मिनिट होल्ड करुन पाहायचा आहे.

स्कॉट्स

स्कॉट्स हा स्नायुंशी निगडीत महत्वाचा व्यायाम मानला जातो. त्याने तुम्हाला लोअर बॉडी आणि फिटनेस लेवल कळते. १ मिनिट तु्म्ही स्कॉट्समध्ये होल्ड करुन पाहू शकता.

कार्डिओ

तुम्ही ५ मिनिटे वगाने चालून तुमचा हार्ट रेट आणि स्टॅमिना तपासू शकता. किंवा तुम्हाला कार्डिओ हा बेस्ट ऑपशन आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचे आरोग्य आणि शक्ती तपासू शकता. यानुसार तुम्ही तुमच्या आहारात सुद्धा बदल केला पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana: वजन कमी करण्यासाठी केळी खावी की नाही?

Manoj Jarange Patil: जीआर निघाला, जरांगे जिंकले, जरांगेंच्या मुंबईतील लढ्याला मोठं यश

Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीला १०२ कोटी रुपयांचा दंड, सोने तस्करीमुळे झाली होती अटक

Manoj Jarange: जरांगेंच्या आंदोलनात कुणाची घुसखोरी? आंदोलनाच्या बदनामीमागे कुणाचा डाव?

FIR On Sanjay Leela Bhansali: चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या विरोधात FIR दाखल, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT