Sakshi Sunil Jadhav
ओला किसलेला नारळ, गूळ, तांदळाचे पीठ, तेल, वेलची पावडर, लाल, हिरवा, पिवळा खाण्याचा रंग, केळीचे पान, मीठ इ.
तांदळाच्या पिठात मीठ आणि थोडंसं तेल घालून मऊसर पीठ मळा. उकड व्यवस्थित थंड झाल्यावरच आकार द्या.
लाल, पिवळा, हिरवा असे खाण्याचे रंग वेगवेगळ्या पिठात मिसळा. यामुळे मोदकाला जास्वंदासारखा सुंदर रंग येतो.
मोदकाचा आकार सुंदर यावा यासाठी पिठाचे बारीक गोळे करून हलकेच पातळ लाटा. खूप जाड लाटल्यास पाकीटासारखे दिसतात.
जास्वंद पाकळीसारखा आकार मिळावा यासाठी मोदक साचा (मोल्ड) किंवा चमच्याच्या मागचा भाग हलकासा वापरु शकतो.
नारळ-गुळाचे सारण कोमट असेल तर पीठ फाटते. पूर्ण थंड झाल्यावरच सारण भरावे.
मोदक वाफवताना केळीच्या पानाचा वापर करा. त्यामुळे मोदकाला चकाकी येते आणि आकार बिघडत नाही.
मोदक जास्त वेळ वाफवल्यास फाटतात. १०-१२ मिनिटे मध्यम वाफ पुरेशी आहे.