Sri Lanka Tourism Saam TV
लाईफस्टाईल

Sri Lanka Tourism : श्रीलंकेत मनसोक्त आणि कमी खर्चात फिरता येणार; कसं वाचा संपूर्ण डिटेल्स

Ruchika Jadhav

प्रत्येकाला फिरण्याची खूप इच्छा असते. काही पर्यटकांना तर परदेशात फिरायला जायचं असतं. जिद्दीने अनेक व्यक्ती स्वत:ची अशी स्वप्ने पूर्ण सुद्धा करतात. काही व्यक्तींना असे वाटते की परदेशात जाण्यासाठी खूप खर्च करावा लागतो. त्यामुळे पैशांची अडचण असल्याने परदेशात फिरायला जायचे प्लान टाळले जातात. पर्यटकांच्या या इच्छेवर मार्ग काढण्यासाठी आम्ही बजेटफ्रेंडली ट्रिप घेवून आलो आहोत. या ट्रिपमुळे तुमचे परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

भारताच्या दक्षिणेकडील छोटासा शेजारचा देश श्रीलंका आहे. पर्यटकांना श्रीलंकेसारखा स्वस्त आणि मस्त देश फिरायला मिळणे कठीण आहे. श्रीलंकेत पर्यटकांना मंदिरे , मॅाल्स, यांसारख्या खूप काही गोष्टी पाहायला मिळतील. त्याचबरोबर पर्यटक खूप काही गोष्टी एक्सप्लोर करु शकता. परदेशातील टूरचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयआरसीटीसी कंपनीने पर्यटकांसाठी एक टूर पॅकेज आणला आहे. या लाँच केलेल्या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मिळणार आहे. जसे की हॅाटेल बुकिंग, खाण्याची ठिकाणे, आणि फिरण्याचे स्पॅाट्स याबद्दल माहिती दिली जाणार आहे.

आयआरसीटीसीच्या टूर पॅकेजमुळे पर्यटकांना कसल्याच गोष्टीची काळजी राहणार नाही. पर्यटकांसाठी ही टूर स्वस्त दरात काढल्याने त्यांना जास्त पैसे खर्च करावे लागणार नाही. जर तुम्हाला पण श्रीलंका टूर एन्जॅाय करायची आहे तर तुम्ही आयआरसीटीसी टूर पॅकेजच्या साहाय्याने बजेटफ्रेंडली ट्रिप एन्जॅास करु शकता. चला तर मग जाणून घेऊया किती खर्च येईल.

श्रीलंकेच्या टूर पॅकेजचा खर्च

परदेशातील ही श्रीलंका ट्रिप इकुर्ली टूर पॅकेजने काढली आहे. ट्रेल्स ऑफ रामायण विथ कथारागम एक्स चेन्ना यांनी हा पॅकेज ६ दिवसांसाठी आयोजित केला आहे. पर्यटकांसाठी ही ट्रिप १७ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या ट्रिपमुळे पर्यटकांचे परदेशातील स्वप्न पूर्ण होणार आहे. या पॅकेजमुळे पर्यटक ही ट्रिप खूप आनंदाने एन्जॅाय करु शकतील.

या सहा दिवसात पर्यटकांना कोलंबो,कटारगामा, कँडी, नुवारा एलिया या प्रेक्षणीय स्थळांना भेट देता जाणार आहे. या सुदंर आयोजनामुळे पर्यटकांना ट्रिपचा पुरेपुर आनंद मिळणार आहे. इकुर्लीचे हे श्रीलंका टूर पॅकेज ५ रात्र आणि ०६ दिवसांसाठी आहे.

परदेशातील श्रीलंकेला जवळून पाहण्यासाठी पर्यटकांना या पॅकेजचे कम्फर्ट तिकिट बुक करावे लागेल. या कम्फर्ट क्लासच्या तिकिटाचे तीन पद्धतीने खर्च सांगितले आहे. एका व्यक्तीसाठी ७९२००, दोन व्यक्तीसाठी ६४५०० आणि तीन व्यक्तींसाठी ६१८०० रुपये खर्च येणार आहे.

या ट्रिपमध्ये तुमच्यासोबत जर ५ ते ११ वर्षातील लहान मुले असतील, तर तुम्हाला त्यांचा खर्च ४०००० पर्यंत करावा लागणार आहे. श्रीलंका ट्रिपची बुकिंग पूर्ण झाल्यावर जर तुम्ही ट्रिप रद्द करणार असाल तर ट्रिप सुरु होण्याच्या ३० दिवस अगोदर तुमच्या पॅकेजमधील वीस टक्के पैसे रद्द केले जाणार आहे. म्हणून तिकिटाची बुकिंग करताना या सर्व गोष्टीची माहिती लक्षात घेवून तिकिटे बुक करा. या संपूर्ण पॅकेजची माहिती तुम्ही www.irctcourism.com या वेबसाईटवरुन मिळवू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

PM Modi Speech: 'काँग्रेसने एससी, एसटी ओबीसींना जाणूनबुजून मागे ठेवलं', PM मोदींचा मोठा आरोप; मविआवरही जोरदार टीकास्त्र| पाहा VIDEO

IAS, IPS अधिकाऱ्यांचा पगार किती? कोण घेतं सर्वाधिक मानधन? जाणून घ्या

Maharashtra News Live Updates: देशातील सर्वात भ्रष्ट परिवार म्हणजे काँग्रेसमधील शाही परिवार - मोदी

MHADA Lottery 2024: घरं 2030, अर्ज तब्बल 134344; किंमती कमी झाल्यानंतर लोकांचा कल वाढला!

SCROLL FOR NEXT