Badlapur Tourism : बदलापूरच्या कुशीत वसलेले निसर्गरम्य अन् मनमोहक हिडन प्लेस; एकदा नक्की भेट द्या

Hidden Places In Badlapur : आज आम्ही तुम्हाला याच बदलापूरमधील काही मजेशीर आणि हिडन प्लेस बद्दल माहिती सांगणार आहोत.
Hidden Places In Badlapur
Badlapur TourismSaam TV
Published On

मुंबईच्या विविध उपनगरांमधील एक बदलापूर शहर येथील निसर्गरम्य वातावरणाने जगप्रसिद्ध आहे. बदलापुरमध्ये अनेक धबधबे आणि ऐतिहासिक ठिकाणे देखील आहेत. आज आम्ही तुम्हाला याच बदलापूरमधील काही मजेशीर आणि हिडन प्लेस बद्दल माहिती सांगणार आहोत.

Hidden Places In Badlapur
Badlapur School Case : बदलापुर अत्याचार प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाकडून दखल, आज सकाळी होणार तातडीची सुनावणी

चंदेरी ट्रेक

चंदेरी हा वांगणीमधील एक सुंदर किल्ला आहे. हा किल्ला येथे असलेल्या व्ही आकाराच्या डोंगरामुळे आणखी आकर्षक वाटतो. चंदेरी सह्याद्री पर्वत रांगेतील एक अद्भुत डोंगर आहे. पावसाळ्यात तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तर तुम्ही येथे नक्की भेट देऊ शकता.

ताहुली शिखर

अंबरनाथ ते बदलापूर या दोन शहरांदरम्यान ताहुली शिखर आहे. तुम्ही येथे ट्रेनने प्रवास करत असाल तर हे शिखर तुम्हाला नेहमी पाहायला मिळत असेल. पावसाळ्यात तुम्ही येथे मजेत ट्रेकींगचा आनंद घेऊ शकता. वन डे ट्रिपसाठी देखील हे ठिकाण उत्तम आहे. तुम्ही येथे सुद्धा छान एन्जॉय करू शकता.

बारवी धरण

बदलापूरपासून जवळपास १५ किलोमीटर अंतरावर बारवी धरण आहे. पावसाळ्यात नेहमीच येथे गर्दी असते. बारवी धरणावरून घसरून आजवर काही व्यक्ती दगावल्यात देखील. मात्र येथे आपण स्वत:ची व्यवस्थित काळजी घेतल्यास पाण्यात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटू शकता.

खंडोबा मंदिर

बदलापूरमधील खंडोबा मंदिर संपूर्ण शहरात प्रसिद्ध आहे. बदलापूरच्या मुळगाव या गावात सदर मंदिर आहे. मंदिराच्या चारही बाजुने डोंगर आणि हिरवळ पसरली आहे. हे मंदिर एका उंच डोंगरावर बांधलं आहे. दरवर्षी येथे खंडोबाची मोठी यात्रा देखील भरते.

Hidden Places In Badlapur
Badlapur Protest: आईच्या ऑपरेशनची तारीख घेण्यासाठी निघाला, अन् थेट तुरुंगात गेला!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com