Kokan Ganpati Festival: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज; मध्य रेल्वेने केली मोठी घोषणा

Kokan Ganpati Festival Special Trains: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी तब्बल १५६ गणपती विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे.
Kokan Ganpati Festival Special Trains
Kokan Ganpati Festival Special TrainsSaam TV

Kokan Ganpati Festival Special Trains: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी तब्बल १५६ गणपती विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. मुंबई ते सावंतवाडी रोड, लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ, दिवा ते रत्नागिरी आणि मुंबई ते मडगाव दरम्यान या गाड्या धावणार आहे.

या १५६ गणपती विशेष गाड्याचे आरक्षण २७ जून २०२३ पासून सुरू होणार आहे. प्रवाशांना रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेस्थळावर जाऊन तिकीटांचे आरक्षण करता येणार आहे.

Kokan Ganpati Festival Special Trains
Samruddhi Mahamarg Accident: चालकाला डुलकी लागली अन् अनर्थ घडला; समृद्धी महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात

मध्य रेल्वेच्या या घोषणेमुळे गणपती सणाकरिता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्याना मोठा दिलासा मिळणार आहे. या १५६ गणपती विशेष गाड्याचे आरक्षण २७ जून २०२३ पासून सुरू होणार आहे. प्रवाशांना रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेस्थळावर जाऊन तिकीटांचे आरक्षण करता येणार आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-सावंतवाडी रोड गणपती स्पेशल ट्रेन सीएसएमटी येथून १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ पर्यत (२० फेऱ्या) पर्यंत दररोज रात्री १२. २० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी २.२० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.

त्याचबरोबर एलटीटी ते कुडाळ या ट्रेनच्या २४ फेऱ्या असतील. सावंतवाडी रोडवरून १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत २० फेऱ्या दररोज दुपारी ३.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ४.३५ वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.

Kokan Ganpati Festival Special Trains
Electric Bike Blast: दुकानासमोर उभ्या असलेल्या इलेक्ट्रिक बाईकचा भीषण स्फोट; भयंकर घटनेचा VIDEO समोर

याव्यतिरिक्त पुणे-करमाळी/कुडाळ-पुणे विशेष गाडीच्या ६ फेऱ्या धावणार आहेत. करमाळी-पनवेल-कुडाळ विशेष (साप्ताहिक)गाडीच्या ६ फेऱ्या धावणार आहेत. तसेच दिवा -रत्नागिरी मेमू स्पेशल (दैनिक) गाडीच्या ४० फेऱ्या धावणार आहेत.

याशिवाय मुंबई- मडगाव विशेष (दैनिक) गाडीच्या ४० फेऱ्या धावणार आहेत. या १५६ गणपती विशेष गाड्याचे आरक्षण २७ जून २०२३ पासून रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेस्थळावर सुरु होणार आहेत.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com