Beed Electric Bike Blast: बीड शहरातून एक भयानक घटना समोर आली आहे. दुकानासमोर उभी असलेल्या इलेक्ट्रिक दुचाकीचा अचानक स्फोट झाला आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, एक व्यक्ती किरकोळ जखमी झाला आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड (Beed News) शहरातील बशीरगंज भागात पठाण फिरोज खान यांचं ईडन कॉम्प्युटर हे दुकान आहे. त्यांच्या दुकानासमोर एक इलेक्ट्रिक दुचाकी (Electric Bike) उभी होती. या दुचाकीमध्ये एक व्यक्ती सामान ठेवत असताना अचानक भीषण स्फोट झाला.
स्फोटानंतर दुचाकीला भीषण आग लागली. स्फोटानंतर काही तरुणांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आगीचा भडका जास्तच उडाला. या घटनेत एक व्यक्ती किरकोळ जखमी झाला. त्याचबरोबर दुचाकीचे मोठे नुकसान झाले.
स्फोटाचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट असून घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे पथक पोहचले आहे. या स्पोटाचे प्रत्यक्षदर्शी गाडी मालक पठाण फेरोज खान यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. 76 हजार रुपये देऊन बाईक खरेदी केली. ते पैशे परत मिळावे. अशी मागणी देखील यावेळी फिरोज खान यांनी केली आहे.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.