Social Media Love SAAM TV
लाईफस्टाईल

Social Media Love : सोशल मीडियावर प्रेम शोधणाऱ्या मुलांनो व्हा सावध! एक चूक अन् आयुष्य वाया

Social Media Side Effects : ऑनलाइन डेटिंग आजकाल सामान्य गोष्ट झाली आहे. मात्र यात तरुणाईचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना पाहायला मिळत आहे. यामुळे सोशल मीडियावर प्रेम शोधताना सावधगिरी बाळगा.

Shreya Maskar

आजकालची पिढी जास्तीत जास्त वेळ सोशल मीडियावर घालवते. सोशल मीडियावर त्यांचे अनेकांशी मैत्री जुळते आणि मग हळूहळू मैत्रीचे प्रेमात रुपांतर होते. पण सोशल मीडियावरील प्रेमात जास्त प्रमाणात फसवणूक होण्याचा धोका असतो.

एकटेपणामुळे लोक सोशल मीडियाकडे खेचले जातात. सोशल मीडियावर तुमची एक चूक तुमचे आयुष्य वाया घालवू शकते. सोशल मीडियावरील फसवणूकीमुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होताना दिसून येतो. एक वाईट अनुभव लोकांचा नातेसंबंधावरील विश्वास उडवून टाकतो.

'या' गोष्टींची घ्या काळजी

  • सोशल मीडियावर जुळलेल्या नात्यामध्ये पटकन समोरच्यावर इम्प्रेस होऊन आपले वैयक्तिक आयुष्य त्यांना सांगू नये. यामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात.

  • सोशल मीडियावर मैत्री जुळली असेल तर प्रेमाचे नाते सुरू करण्यापूर्वी त्या व्यक्तीला प्रत्यक्षात भेटा आणि मगच नाते पुढे घेऊन जायचे की नाही याचा विचार करा. कारण सोशल मीडियावर फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाऊ लागले आहे.

  • सोशल मीडियावरील नात्यात जोवर संपूर्ण विश्वास येत नाही तोवर मर्यादा ठेवून एकमेकांशी वागा.

  • सोशल मीडियावर तुम्ही जर एखाद्याच्या प्रेमात पडला असाल तर त्यांच्याशी मेसेज आणि व्हिडीओ कॉल आणि फोटो शेअर करताना सावधगिरी बाळगा.

  • सोशल मीडियावर सुरू झालेल नातं जोवर तुम्ही त्या व्यक्तीला प्रत्यक्षात भेटत नाही तोवर जास्त गंभीरपणे घेऊ नका. भावनिकरित्या त्या व्यक्तीमध्ये अडकू नका.

  • तुमची पहिल्यांदा प्रत्यक्ष भेट ही सार्वजनिक जागांवर करा. चुकूनही एकट्यात भेटायला जाऊ नका.

  • त्या व्यक्तीला प्रत्यक्षात भेटायला जाण्यापूर्वी आपले लाईव्ह लोकोशन तुमच्या जवळच्या व्यक्तीला पाठवून ठेवा.

  • पहिल्या भेटीत खाण्यापिण्याबाबत थोडी सावधगिरी बाळगा.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : घरातलं भांडण चव्हाट्यावर; निकालानंतर दादांचे काकांवर आरोप, VIDEO

Maharashtra News Live Updates: रश्मी शुक्ला यांची पुन्हा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

Maharashtra Politics: मनसेला EVM वर भरोसा नाय का? अपयशाची सल, EVMमधून खल?

Arjun Tendulkar: सचिनचा लेक रिकाम्या हाती परतला! अर्जुन तेंडुलकर अन्सोल्ड

Maharashtra Politics : अमित शहा मुंबईत येणार, मुख्यमंत्रिपदाची घोषणा करणार? पडद्यामागे काय घडतंय? वाचा

SCROLL FOR NEXT