Tiles Cleaning Tips  Saam tv
लाईफस्टाईल

Tiles Cleaning Tips : घरातील फरशी कळकट झालीये? सोप्या ट्रिक्स वापरा, नव्या फरशीसारखी चमकेल

Tiles Cleaning Tips in Marathi : घरातील फरशी कळकट झाली असल्यास सोप्या ट्रिक्स वापर करून फरशी स्वच्छ करू शकता.

Vishal Gangurde

अनेक जण घर स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करत असतात. यासाठी आठवड्यातून एकदा नवनव्या युक्त्या करत घर स्वच्छ ठेवत असतात. अनेक जण घरातील पंखे स्वच्छ करणे किंवा घरातील वस्तूंची साफसफाई करतात. त्यावेळी घरातील फरशी खराब होते. खराब झालेल्या फरशीवरील डाग लवकर स्वच्छ होत नाही. त्यासाठी काही ट्रिक्स वापरून फरशी स्वच्छ करता येईल.

१) लादी पुसण्यासाठी नेहमीप्रमाणे फिनाईल आणि डिटर्जेंट घालून लादी पुसा. त्यानंतरही लादी व्यवस्थित दिसत नसेल तर इतर उपाय करू शकतात. फरशीवर ग्रीसचे डाग लागले असतील. तर डाग काढून टाकण्यासाठी कार्बोनेट सोडा आणि गरम पाण्याचे मिश्रण घ्या. तुम्ही या मिश्रणात सर्फ देखील मिसळू शकतो. मिश्रण फरशीवर लावल्यास जमिनीवर लागलेले ग्रीसचे डाग लगेच निघून जातील.

२) लादी पुसण्याचं कापड हायड्रोजन पेरोक्साईडमध्ये मिसळा. त्यानंतर डाग लागलेल्या फरशीवर कपड्याने रगडून स्वच्छ करा. फरशी स्वच्छ केल्यानंतर कपडा पाण्याने स्वच्छ करा. स्वच्छ केल्यानंतरही फरशीवर डाग असेल तर त्यासाठी ऑक्सिजन बेस्ड क्लिनरचा वापर करा. ऑक्सिजन बेस्ड क्लिनर हे डाग असलेल्या फरशीवर लावून ब्रश करा. पुढे १५ मिनिटांनी पाणयाने धुवून स्वच्छ करा.

३) फरशीवर लागलेले डाग काढून टाकण्यासाठी बोरोक्सचा वापर करता येईल. दोन चमचे बोरेक्स पावडर ही ४ लिटर पाण्यात मिसळा. या मिश्रणाने फरशी आणि टाईल्स स्वच्छ करा. तसेच डाग असलेल्या फरशीवर बोरेक्स पावडर लावून डाग स्वच्छ करा. बोरेक्स पावडरच्या वापरामुळे डाग कमी होण्यास मदत होईल. (Tiles Cleaning Tips in Marathi)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सरकार कर्ज मुक्ती कधी करणार? उद्धव ठाकरेंचा शासनाला रोखठोक सवाल

Kidney Health: किडनी खराब होण्याची ५ महत्त्वाची लक्षणे, दुर्लक्ष केल्यास होतील गंभीर आजार

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, भायखळ्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड; मुंबईकडे येणाऱ्या लोकल खोळंबल्या| VIDEO

Bigg Boss 19: भैया से सैयां...; विकेंड का वारमध्ये सलमान खाननेच केली तान्या मित्तलची पोलखोल

Shocking News : रात्री झोपेतून उठवलं अन् गच्चीवर नेलं, १४ वर्षीय मुलीवर बलात्कार; नातेवाईकाचं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT