Hindi Language Controversy : मोठी बातमी! हिंदी सक्तीविरोधात उद्धव-राज ठाकरेंचा एकत्र मोर्चा निघणार? मनसेचा ठाकरेंना नवा प्रस्ताव

Uddhav and Raj Thackeray on Hindi Langauge: हिंदी सक्तीविरोधात दोन्ही बंधूंचे वेगवेगळे मोर्चे निघणार आहेत. त्यामुळे मनसेने एक मोर्चा काढण्यासाठी उद्धव ठाकरेंना एक प्रस्ताव पाठवला आहे.
Uddhav and Raj Thackeray
Uddhav and Raj Thackeray Saam tv
Published On

हिंदी भाषा सक्तीविरोधात राज्यातील वातावरण तापलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदी भाषा सक्तीविरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही नेत्यांनी स्वतंत्र्य पत्रकार परिषद घेऊन हिंदी सक्तीविरोधात आक्रमक भूमिका घेत मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले. मनसेने हिंदी सक्तीविरोधात ५ जुलै रोजी मोर्चा काढण्याचं ठरवलं आहे. तर उद्धव ठाकरे यांचा ७ जुलै रोजी मोर्चा निघणार आहे. मात्र, हिंदी सक्तीविरोधात एकच मोर्चा असायला हवा, असा प्रस्ताव मनसेने उद्धव ठाकरे यांना पाठवला. त्यामुळे हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

हिंदी सक्तीविरोधात मनसे आणि ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. एकीकडे राज ठाकरे यांनी कोणत्याही पक्षाचा झेंडा न घेता ५ जुलै रोजी हिंदी सक्तीविरोधात मोर्चा काढणार आहेत. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी दीपक पवार यांच्या संघटनेच्या माध्यमातून काढण्यात येणाऱ्या मोर्चात सहभागी होणार आहेत. मात्र, एक मुद्दा असताना दोन मोर्चे निघत असल्याने मनसेने उद्धव ठाकरे यांना हिंदी सक्तीविरोधात एकच मोर्चा निघायला हवा. हिंदी सक्तीविरोधात मराठी एकजूट दिसावी, यासाठी एकत्र मोर्चा काढला पाहिजे, असा प्रस्ताव मनसेने उद्धव ठाकरे यांना पाठवला आहे.

Uddhav and Raj Thackeray
Prakash Ambedkar : अचानक 76 लाख मतांची भर, विधानसभेची निवडणूक पारदर्शक होती का? प्रकाश आंबेडकरांचा कोर्टाच्या निर्णयावर सवाल

प्रस्तावानंतर दोन्ही पक्षातील नेत्यांची मोर्चाबाबत एकमेकांशी बोलणं झाल्याची माहिती मिळत आहे. याबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचं बोललं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या जोरदार चर्चा सुरु आहे. याचदरम्यान, मनसेने पाठवलेल्या प्रस्तावाला महत्व प्राप्त झालं आहे. दुसरीकडे मनसेने त्यांच्या मोर्चाची तारीख बदली आहे. सहा तारखेला होणारा मोर्चा आता ५ तारखेला होणार आहे.

Uddhav and Raj Thackeray
Vishal Yadav Pakistan Case : घरातच गद्दार, ५० हजारांसाठी विकला; नौदलाच्या कर्मचाऱ्याने पाकिस्तानला दिली भारताची अतिमहत्वाची माहिती

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, 'मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी येत्या ६ जुलैला मोर्च्याची घोषणा केली होती. त्यात थोडा बदल असून हा मोर्चा रविवार ६ जुलैच्या ऐवजी ५ जुलै शनिवारी सकाळी १० वाजता असणार आहे. बाकी ठिकाण आणि इतर सर्व तपशील तसेच असणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने या बदलाची नोंद घ्यावी'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com