चालणे यासारखा सोपा व्यायाम नाही. बरेच लोक उत्तम आरोग्यासाठी दिवसातून किमान अर्धा तास चालायला जातात. सकाळी किंवा संध्याकाळी वॉक केल्याने शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाणे राहते. यात काही मंडळींना शांत वातावरणात एकटं चालायला आवडत. तर दुसरीकडे काही लोक किंवा तरूण इअरफोन किंवा हेडफोन लावून गाणी ऐकत चालतात. यात कोणती पद्धत योग्य आणि कोणती अयोग्य हे आपण जाणून घेणार आहोत.
तज्ज्ञांच्या मते, एकटे आणि शांततेत चालण्याने मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. जेव्हा आपण कोणत्याही बाह्य आवाजाशिवाय किंवा संगीताशिवाय चालतो तेव्हा आपल्या मेंदूला चालताना शांतता आणि लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळते. या वेळेत आपण आपल्या विचारांशी जोडण्यासाठी वेळ काढू शकतो. त्यामुळे दिवसभराचा ताण सुद्धा कमी होतो.
चालताना तुम्ही जेवढे डिजिटल उपकरणांपासून लांब राहता तेवढे तुम्ही स्वत: नवीन गोष्टी शिकण्यासाठी आत्मसाद करण्यासाठी सक्षम होता. दुसरीकडे, इअरफोन किंवा हेडफोन घालून चालण्याचेही अनेक फायदे आहेत. यामुळे आपल्याला बाहेरील आवाजापासून सुटका मिळण्याची संधी मिळते. मात्र संगीत आपली मानसिक आरोग्याची स्थिती स्थिर राहू देत नाही. संगीत किंवा पॉडकास्ट ऐकताना आपण काही प्रमाणाक बाह्य जगापासून तुटतो.
इयरफोन किंवा हेडफोन वापरताना उद्धवणारी आणखी एक समस्या म्हणजे आपण आपल्या सभोवतालच्या आवाजांपासून दूर जातो. जेव्हा आपण संगीतात हरवून जातो तेव्हा आपल्याला पानांचा खळखळाट, पक्षांचा आवाज किंवा वाऱ्याचा आवाज जाणवत नाही. यामुळे पर्यावरणाशी आपला संबंध कमी होतो आणि मानसिक त्रास होऊ शकतो.
सतत विचार आणि चिंतांपासून मुक्त होण्यासाठी शांततेने चालणे हा एक चांगला मार्ग असू शकतो. शांतपणे चालत असताना, तुम्हाला तुमची शारिरीक स्थितीच जाणवत नाही, तर तुमच्या मानसिक आणि भावनिक अस्वस्थतेशीही जोडता येते. मानसिक ताण कमी करण्याचा आणि सकारात्मक विचार वाढवण्याचा हा एक प्रभावी मार्ग असू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.