
केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. त्यात आरोग्य अर्थसंकल्पावर त्यांनी काही विशेष माहिती दिली. त्यात दुर्धर आजार कॅन्सरला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने या बजेटमध्ये महत्वाच्या मुद्दा मांडला. त्यात कॅन्सरवर उपचार करणाऱ्या हॉस्पिटल्समध्ये डे-केयर सेंटर ची सुरूवात करण्यात येणार आहे.
त्याने कॅन्सरच्या रुग्णांची संपुर्ण काळजी घेतली जाणार आहे. हा आजार फार गंभीर आणि प्राणघातक आहे. याने रुग्णांच्या घरच्यांना आर्थिक, मानसिक आणि शारिरीक हानी पोहचू शकते. याची चिंता कमी करण्यासाठी हा निर्णय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतला आहे.
कॅन्सर डे केअर सेंटर
आता सरकार सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये कॅन्सर डे केअर सेंटर उभारणार आहे. यात २०२५-२६ मध्ये २०० कर्करोग केंद्र स्थापित होणार आहेत. यामुळे रुग्णाबरोबर त्यांच्या कुटुंबीयांना उपचारासोबत मानसिक आधार आणि व्यावहारिक मदतही दिली जाणार आहे. डे केअर सेंटर्स रुग्णांना उपचार करून त्याच दिवशी घरी पाठवले जाणार आहे. त्याने त्यांना लवकरात लवकर ठिक होण्यास मदत करू शकते आणि वेळ तसेच पैसा वाचवण्यासाठी सुद्धा मदत करू शकते.
डे केअर सेंटर म्हणजे काय?
डे केअर सेंटर्स केमोथेरपी इन्फुजन सुविधा देतात. जे प्रायव्हेट लाउंज किंवा कॉमन एरियामध्ये दिले जाऊ शकते. डे केअर सेंटर्स रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कर्करोगाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी समुपदेशन आणि इतर समर्थन पुरवतात.
डे केअर सेंटर कसे कार्य करते?
कॅन्सर आणि इतर गंभीर आजारांवरील औषधांच्या किमतीही कमी होतील. त्यामुळे उपचारादरम्यान, औषधांच्या किमतीमुळे सर्वसामान्यांना आर्थिक अडचणीतून जावे लागत आहे. निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले की, या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने राज्यांच्या सहकार्याने खेड्यापाड्यातील सामान्य लोकांना आरोग्य सुरक्षा देण्यासाठी २०० कॅन्सर डे केअर सेंटर्स उघडण्याची घोषणा केली आहे. यामुळे गावातील रुग्णांना प्राथमिक तपासणी करण्यात मदत होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.