Nail Health: तुमच्या नखांवरून ओळखा तुमच्या शरीरातली कमी, करा हे कॅल्शियम वाढवणारे उपाय

Calcium Deficiency : कॅल्शियममुळे अनेक फायदे होतात ते म्हणजे हाडांची मजबूती, स्नायुंचे कार्य, रक्ताच्या गाठींपासून सुटका किंवा नियंत्रण आणि दातांची मजबूती.
Calcium Deficiency
Nail Health canva
Published On

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कॅल्शियम खूप महत्वाचा असतो. कॅल्शियमचे प्रमाण जर योग्य प्रमाणात असेल तरच आपण चांगले जीवन जगू शकतो. कॅल्शियममुळे अनेक फायदे होतात ते म्हणजे हाडांची मजबूती, स्नायुंचे कार्य, रक्ताच्या गाठींपासून सुटका किंवा नियंत्रण आणि दातांची मजबूती. पण आपल्या शरीरातले जर कॅल्शियम संपले असेल तर आपण आपल्या नखांद्वारे ओळखू शकतो. ते कसं? हे आपण पुढील माहितीतून जाणून घेणार आहोत.

जेव्हा आपल्या शरीरात कॅल्शियमची कमी होते तेव्हा, अचानक नखांमध्ये बदल जाणवतात. त्यात नख कमकुवत होतात, ठिसुळ होतात, पांढऱ्या रेघा नखांमध्ये दिसतात, नखे नाजूक होतात. ही सर्व लक्षणे असू शकतात. याचं कारण म्हणजे आपला आहार. आहारात आपण जे पदार्थ खातो ते पदार्थ आपल्या शरीराला वेगवेगळे गुणधर्म देत असतात.

Calcium Deficiency
Diet Tips: चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी आजच आहारात करा या ४ पदार्थांचा समावेश, अन्यथा कमी वयातच नजर होईल धुसर

यांसारख्या पदार्थांमुळे आपल्या शरीराला आवश्यक असणारे घटक मिळू शकतात. त्याचसोबत आपले सौंदर्य सुद्धा आपल्या रोजच्या आहारावर ठरत असते. त्यातला महत्वाचा भाग म्हणजे आपली नखे आहेत. आता आपण नखांवरील कोणकोणती लक्षणे कॅल्शियमच्या कमतरतेशी संबंधित असू शकतात, हे जाणून घेणार आहोत.

नखे सतत तुटणे

तुमची नखे जर ठिसूळ झाली तर ती हाताने निघतात. त्यावेळेस तुमच्या शरीरातले कॅल्शियम कमी असते. त्याने तुमच्या नखांची योग्य वाढ होत नाही. त्याच सोबत नखे एकदम पातळ होतात.

नखांवर पांढऱ्या रेषा किंवा डाग दिसणे

नखांवर पांढऱ्या रेषा किंवा डाग दिसणे हेही कॅल्शियमच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. याला लीकोनिशिया असेही म्हणतात. हे दिसण्यामागचे कारण म्हणजे शरीरात कॅल्शियम किंवा झिंकच्या कमतरतेचे निशाणी असू शकते.

नखांवर खड्डे किंवा असमान पृष्ठभाग

हेल्दी नखे ही गुळगुळीत आणि चमकदार असतात. मात्र जर तुमच्या नखांवर पृष्ठभागावर लहान खड्डे, असमान भाग किंवा खडबडीतपणा असेल तर कॅल्शियमची कमी असते.

नखे पिवळी होणे

तुमची नखे गुलाबी रंगा ऐवजी गुलाबीसर आणि चमकदार नसतील तर त्याऐवजी फिकट पांढरट किंवा पिवळसर दिसू लागली असतील तर तुमच्या शरीरात कॅल्शियम आणि लोहाचे प्रमाण कमी असते.

कॅल्शियमच्या कमतरतेवर उपाय काय?

शरीरात हेल्दी सीड्स, काजू, कडधान्ये, राजमा, बीन्स, चिकन आणि अंडी याशिवाय तुम्ही कॅल्शियम प्रथिनांसाठी दुधाचे पदार्थ सेवन करू शकता.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Calcium Deficiency
Gita Updesh: व्यक्तीने 'या' ४ गोष्टींचा कधीही अहंकार करू नये; भविष्य होईल बर्बाद, श्रीकृष्णाने गीतेमध्ये केलंय नमूद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com