Gita Updesh: व्यक्तीने 'या' ४ गोष्टींचा कधीही अहंकार करू नये; भविष्य होईल बर्बाद, श्रीकृष्णाने गीतेमध्ये केलंय नमूद

Bhagavad Gita : भगवद्‌गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांच्या उपदेशांची माहिती देण्यात आली आहे. याचं योग्य पद्धतीने पालन केल्यास आयुष्यात समस्या येणार नाहीत. जाणून घेऊया गीतेमध्ये असं काय नमूद करण्यात आलंय.
Gita Updesh
Gita Updeshsaam tv
Published On

भगवद्‌गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ असून यामध्ये जीवनातील निर्णायक प्रसंगी श्रीकृष्ण अर्जूनाला गीता रहस्य सांगतात. गीतेमध्ये दिलेलं ज्ञान हे अमूल्य असल्याचं मानलं जातं. सध्याच्या काळात प्रत्येकाने गीतेमध्ये दिलेल्या उपदेशांचे पालन केल्यास जीवनात अपयशाचा सामना करावा लागणार नाही, असंही म्हटलं जातं.

सनातन धर्मात अनेक ग्रंथ आणि धर्मग्रंथ आहेत, ज्यांचे मानवी जीवनात महत्त्वाचं स्थान आहे. आपले धर्मग्रंथ आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग शिकवतात. यापैकी एक धर्मग्रंथ म्हणजे श्रीमद्भगवद्गीता गीता. गीतेचं अनुसरण करणारी व्यक्ती केवळ यश मिळवत नाही तर जगापासून वेगळा दृष्टीकोन देखील ठेवतं. गीतेमध्ये श्री कृष्णाने लिहिलेली शिकवण एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी नेहमीच प्रेरणा देते.

गीतेची शिकवण प्रत्येक व्यक्तीला धार्मिक, नैतिक आणि तात्विक दृष्टीकोन देते. गीतेमध्ये भक्ती, ज्ञान आणि योग यांचेही माणसाच्या जीवनाशी संबंधित प्रत्येक क्षेत्राविषयी स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. यासोबतच असंही सांगण्यात आलंय की, व्यक्तीने आयुष्यात कधीच काही गोष्टींचा अहंकार करू नये. असं केल्याचे त्या व्यक्तीचं भावी आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांचा कधीही गर्व करू नये.

Gita Updesh
Bhagavad Gita: भगवद्‌गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितली आहेत ४ महापापं; अशी कामं केल्यास कधीच मिळू शकणार नाही माफी

स्वतःच्या ज्ञानाचा अहंकार

गीतेमध्ये श्रीकृष्णाने स्वतः सांगितलं की, माणसाने कधीही आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये. याचं कारण ज्ञान नेहमी नम्रतेने येतं आणि अहंकाराने मिळालेलं ज्ञान व्यक्तीसोबत जास्त काळ राहू शकत नाही. अशावेळी ज्ञान व्यक्तीची साथ सोडू शकतं. अशा स्थितीत माणूस कधीही त्याच्या क्षेत्रात प्रगती करू शकत नाही.

Gita Updesh
Bhagavad Gita : मनुष्य पापं करण्यासाठी का भाग पडतो? भगवद्‌गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितली कारणं

सुंदरतेचा गर्व

श्रीमद्भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलंय की, माणसाने कधीही त्याच्या सौंदर्याचा गर्व बाळगू नये. कारण बाह्य सौंदर्य एखाद्याला काही काळासाठी प्रभावित करू शकतंय आत्म्याचे सौंदर्य संपूर्ण आयुष्यासाठी प्रभावित करतं. म्हणून शरीराच्या सौंदर्यापेक्षा आत्मा शुद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

Gita Updesh
Bhagavad Gita: अशी कोणती कामं आहेत जी विवाहित महिलांनी करू नये; भगवद्‌गीतेमध्ये श्रीकृष्णांनी नमूद केल्यात गोष्टी

पैशांचा गर्व

भगवान श्रीकृष्ण सांगतात की, माणसाला कधीही त्याच्याकडे असलेला पैसा आणि संपत्तीचा गर्व नसावा. या कारणाने त्याने कोणाचाही अपमान करू नये. कारण कुणाकडे आज पैसा असेल तर उद्या कुणाला जास्त मिळेल. म्हणून पैशाचा अहंकार बाळगू नका.

मोठ्या कुळात जन्म घेतल्याचा अहंकार

गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतात की, माणूस मोठ्या कुळात जन्म घेऊन कधीच महान होत नाही. अशावेळी त्याने या गोष्टीचा कधीही गर्व करू नये. उच्च जातीत जन्माला आलेला माणूस इतरांकडे तु्च्छ नजरेने पाहत असेल तर तो सर्वांच्या नजरेत न्यूनगंडाचा बळी ठरतो. अशावेळी तो व्यक्ती आपला आदर गमावतो.

Gita Updesh
Bhagavad Gita: भगवद्‌गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितली मनुष्याच्या बर्बादीची कारणं; वेळीच व्हा सावध

टीप : वरील सर्व माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम आम्ही कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com