Diet Tips: चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी आजच आहारात करा या ४ पदार्थांचा समावेश, अन्यथा कमी वयातच नजर होईल धुसर

Eye health foods: डोळे हे प्रत्येक माणसासाठी नेहमीच महत्वाचे असतात. डोळ्यांशिवाय आपण कोणतीच गोष्ट पाहू शकत नाही. त्यासाठी त्यांची काळजी घेणे खूप महत्वाचे असते.
Eye health foods
Foods to improve eyesight AI
Published On

डोळे हे प्रत्येक माणसासाठी नेहमीच महत्वाचे असतात. डोळ्यांशिवाय आपण कोणतीच गोष्ट पाहू शकत नाही. त्यासाठी त्यांची काळजी घेणे खूप महत्वाचे असते. सध्या लोक अनेक तास स्क्रीनवर काम करत असतात. त्यात विरंगुळ्यासाठी सुद्धा फोन, लॅपटॉपचाच वापर करतात. त्यामुळे अनेकांना नजर धुसर होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते.

आता लोक जर अर्धा दिवस काम करत असतील तर त्यांना ताण येणं, थकवा येणं, हातपाय दुखणं यांसारख्या समस्याना सामोरे जावे लागते. त्याचा परिणाम त्यांच्या डोळ्यावर होत असतो. ही समस्या फक्त मोठेच नाही तप लहान मुलांना सुद्धा असते. मात्र यावर उपाय आहे. हेल्थ एक्सपर्टसच्या मते काही पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही डोळ्यांचे आरोग्य सुधारू शकता.

Eye health foods
Som Pradosh Shivratri: सोमवारी सोम प्रदोष शिवरात्रि व्रत करताना 'या' गोष्टी करणं टाळू नका, अन्यथा...

गाजर डोळ्यांसाठी फायदेशीर आहे का?

गाजरामध्ये असलेले व्हिटामीन ए डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असते. तसेच बीटा कॅरोटीनच्या मदतीनं तुम्ही डोळ्यांचे आरोग्य सुधारू शकता. त्यामुळे गाजर तुमच्या रोजच्या सॅलेडमध्ये असणे फायदेशीर ठरेल.

आवळा डोळ्यांसाठी सुद्धा फायदेशीर असतो का?

आवळ्यामध्ये व्हिटॅमीन सी असते जे डोळ्यांचे चांगले सौरंक्षण करते. तसेच आवळ्याने ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होते. तसेच आवळ्याच्या सेवनाने डोळ्यांची रोशनी वाढते.

पपई

पपईमध्ये व्हिटामीन ए, व्हिटामीन सी आणि ई जास्त प्रमाणात असते. हे व्हिटॅमीन्स डोळ्यांसाठी फार आवश्यक असतात. त्यांच्या मदतीने डोळ्यांवरील सुर्याची किरणं आणि गॅजेट्सच्या साईट इफेक्ट कमी होऊ शकतो.

रताळे

हिवाळ्यात मिळणारे रताळे व्हिटामीन सी, एने समृद्ध असते. याची चव सुद्धा अप्रतिम असते. तुम्हाला जर चष्मा असेल तर तुम्ही रताळे दिवसातून किमान एकदा तरी खावे. त्याने तुमच्या नजरेचा धुसरपणा अगदी कमी होऊ शकतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Eye health foods
Fashion Tips: फॅशनेबल दिसण्यासाठी तुम्ही पण करता या चुका? वेळीच व्हा सावध, नाहीतर नको ते आजार लागतील मागे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com