Fashion Tips: फॅशनेबल दिसण्यासाठी तुम्ही पण करता या चुका? वेळीच व्हा सावध, नाहीतर नको ते आजार लागतील मागे

Fashion: फॅशनेबल दिसण्यासाठी महिला नको नको ते उपाय करत असतात. मात्र अनेकदा त्याच फॅशनच्या नादात त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी त्यांनी काही बदल वेळीच करणे आवश्यक आहे.
Fashion
Fashion Tipsai
Published On

आत्ताच्या काळात अशी कोणतीच व्यक्ती नाही जिला फॅशनेबल राहायला आवडत नाही. त्यात पुरुषांपेक्षा महिला त्यांच्या फॅशनसाठी अनेक उपाय करत असतात. नवनवीन ट्रेंड फॉलो करत असतात. त्यात मेकअप, दागिने, कपडे अशा अनेक फॅशन संबंधित गोष्टींचा समावेश असतो. याचा वापर करून महिला चांगलं दिसण्याचा प्रयत्न करत असतात. पण या फॅशनमुळे त्यांच्या शरीरावर किती घातक परिणाम होऊ शकतात याची कल्पना सुद्धा त्या करू शकत नाहीत.

हल्ली डाएट करून फिट राहण्याचा ट्रेंड आलाय. अर्थात हा ट्रेंड शरीरासाठी चांगलाच आहे. मात्र त्याचे फॅशनमध्ये रुपांतर झाले की त्याचा परिणाम महिलांवर फार वाईट पद्धतीने होतो. महिला फॅशनेबल दिसण्यासाठी वेगवेगळे कपडे, मेकअप, ज्वेलरी, चपला वापरतात. त्याचा परिणाम त्यांच्या तब्बेतीवर होतो.

Fashion
Airplane Horns: विमानात हॉर्न असतात का? उत्तर ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

महिला नेहमीच फॅशनच्या बाबतीत आघाडीवर असतात. त्यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे कपडे. त्यामध्ये जीन्स हा विषय सद्ध्या ट्रेंडिग आहे. जीन्सचा वापर टॉप, टी-शर्ट, शर्ट, कुर्ता या सगळ्यावर होतो. तशा प्रकारच्या विविध ट्रेंडी जीन्स सुद्धा बाजारात मिळतात. मात्र त्यात काही महिला जास्त सुंदर दिसण्यासाठी घट्ट जीन्सचाच वापर करतात. त्याने दिसायला आकर्षक वाटेल असा त्यांचा समज असतो. मात्र याची दुसरी बाजू त्यांच्या लवकर लक्षात येत नाही.

घट्ट जीन्सचा वापर केल्याने शरीरावर वाईट परिणाम होतो. जर तुम्ही घट्ट जीन्स ५ ते ६ तास परिधान केली असेल तर, तुमच्या खालच्या कंबरेतील रक्ताभिसरण कमी होते आणि त्यामुळे ह्दयविकाराचा धोका वाढतो. तर हाय हिल्समुळे पायाला दुखापत, सांधेदुखी, टाचदुखी, पाठदुखीच्या तक्रारी होऊ शकतात. तसेच जड कानातले घातल्याने कानाला इजा होते. मेकअपचा वापर केल्यामुळे त्वचेला अॅलर्जी, मुरूम आणि सुरकुत्या होऊ शकतात.

Fashion
Makhana: मखाणे शरीरासाठी थंड आहेत की गरम? जाणून घ्या हे खाण्याचे फायदे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com