Health care Saam Tv
लाईफस्टाईल

Heart Attack: सायलेंट हार्ट अटॅक...अत्यंत धोकादायक आणि न समजून येणारी लक्षणं, काय आहेत जाणून घ्या

Heart Attack Symptoms: सायलेंट हार्ट अटॅक वेदनांशिवाय होतो. दुर्लक्षित लक्षणांमुळे हृदयाचे गंभीर नुकसान होऊ शकते. वेळेवर तपासणी व जागरूकता अत्यंत आवश्यक आहे.

Sakshi Sunil Jadhav

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना हार्ट अटॅकसारख्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. यामागे तुमची धावपळ, खाण्याच्या वेळा, कामाचा ताण, इतर गोष्टींसाठी केलेली धावपळ, कुटू्ंबाचे टेंन्शन अशा सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. याचा परिणाम आपल्या नकळत हदयावर होत असतो, आणि जेव्हा याचे प्रमाण अधिक होते तेव्हा हार्ट अटॅकच्या समस्येला सामोरे जावे लागते. Who च्या संशोधनानुसार दरवर्षी १.८ कोटी लोकांचा मृत्यू हदयविकारांमुळे होतो. पुढे आपण याच आजाराची सुरुवातीच्या दिवसांमधील सामान्य लक्षणे कोणती? ही जाणून घेणार आहोत.

सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे हृदयाकडे जाणाऱ्या रक्तपुरवठ्यामध्ये काहीतरी अडथळा निर्माण होणे. धमन्यांमध्ये कोलेस्टेरॉल आणि फॅट साचल्यामुळे (प्लाक) रक्तप्रवाह अडतो. मात्र, सामान्य हार्ट अटॅकप्रमाणे तीव्र छातीत दुखणे किंवा असह्य वेदना न जाणवल्याने हा अटॅक 'सायलेंट' राहतो. त्यामुळे हृदयाचे नुकसान हळूहळू वाढत जाते आणि रुग्णाला याची कल्पनाही येत नाही.

तज्ज्ञांच्या मते ४० वर्षांवरील व्यक्ती, मधुमेही रुग्ण, लठ्ठपणा असलेले लोक, उच्च रक्तदाबाचे रुग्ण तसेच बसून किंवा आळसात जीवनशैली जगणाऱ्यांना सायलेंट हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो. सततचा मानसिक ताण, थकवा, अपुरी झोप आणि असंतुलित जीवनशैलीमुळे हा धोका आणखी वाढतो. याकडे दुर्लक्ष केल्यास हा प्रकार लक्षात न आल्यास हृदयाचा स्नायू कमकुवत होऊन गंभीर हृदयरोग उद्भवू शकतो.

छातीत जडपणा, दडपण किंवा जळजळ जाणवणे, पाठ, मान, घसा किंवा खांद्यामध्ये सौम्य वेदना होणे, अचानक धाप लागणे किंवा प्रचंड थकवा जाणवणे, झोपेचा त्रास होणे, मळमळ, हलका घाम येणे किंवा गोंधळल्यासारखे वाटणे ही काही संभाव्य चिन्हे असू शकतात. अनेकदा ही लक्षणे गॅस, अॅसिडिटी किंवा साध्या थकव्यामुळे होत असल्याचे समजून दुर्लक्षित केली जातात.

विशेषतः मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये वेदना जाणवण्याची क्षमता कमी झालेली असल्याने सायलेंट हार्ट अटॅक ओळखणे अधिक कठीण होते. त्यामुळे अशी लक्षणे वारंवार जाणवत असतील तर दुर्लक्ष न करता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे, ईसीजी आणि आवश्यक तपासण्या करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : अजित पवारांच्या विमानाचा स्फोट का झाला? ब्लॅक बॉक्स जळाला? रोहित पवारांनी थेट व्हिडिओ दाखवला

Maharashtra Live News Update: कागद जळाले नाही, ब्लॅकबॉक्स कसा जळाला? अजित पवारांच्या अपघातावरुन रोहित पवारांचे सवाल

अल्पसंख्याक शाळांच्या प्रमाणपत्राचा घोटाळा; रोहित पवारांनी जारी केलं घोटाळ्याचं रेटकार्ड

Ajit Pawar Death : पायलटचा वापर करुन अजितदादांचा घातपात? रोहित पवार नेमकं काय म्हणाले....

Pune Crime : भिगवण अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट! पीडित तरुणी आरोपींच्या संपर्कात, नेमकं काय प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT