Sakshi Sunil Jadhav
काळजी करून कोणत्याही गोष्टी होत नाहीत. उलट तिढा वाढत जातो. आज आपल्या जोडीदाराचा सल्ला विचारात घेतल्यास मार्ग सुकर होतील.
अनेक ठिकाणी कष्ट मेहनत करून मिळालेला पैसा किंवा जिन्नस ऐवज याची आज काळजी घेणे गरजेचे आहे. कोणीतरी जवळची व्यक्ती किंवा नोकर, चाकर यांच्यापासून यासाठी धोका दिसतो आहे.
विष्णू उपासनाने दिवसाची सुरुवात करा दिवस अतिशय उत्तम जाईल. उपासना मार्गामध्ये आपला आलेख उंचावेल. जवळच्या लोकांकडून योग्य सहकार्य मिळेल.
घरी पाहुण्यांचे आगमन होईल. कुटुंबातील वातावरण आनंदी आणि सुखदायक राहील. नव्याने काही गोष्टींची खरेदी होईल.
प्रेमामधून लाभ होतील. न ठरवता काही गोष्टी सहज होणार आहेत. आपला आत्मविश्वास अगदी शिगेला पोहोचेल. धाडसाने आणि धडाडीने नवीन काम करण्यासाठी निधड्या छातीने पुढे जाल.
केलेल्या कामाची पावती आज मिळेल. पैशाचे चलन वलन चांगले राहील. जोडीदाराच्या तब्येतीची मात्र काळजी घ्यावी लागेल. कुठेही साक्षीदार आज राहू नका.
मनामध्ये असलेल्या गोष्टी अस्तित्वात उतरण्यासाठी प्रयत्न कराल. आपला इतरांवर प्रभाव राहील. आपले व्यक्तिमत्व उजळून येईल. दिवस आनंदी आणि आशादायी आहे.
मनस्थिती खराब होण्यासाठी अनेक वाटा येतील. मात्र आपल्याला खंबीर राहायचे आहे हे लक्षात ठेवा. खर्चाला गळतीच राहील. अध्यात्माची कास धरल्यास दिवस बरा जाऊ शकतो.
प्रेम केले आहे तर ते निभावावे लागेल. जोडीदाराबरोबर कदाचित किरकोळ वादविवाद होतील. पण प्रेम अबाधित राहील. समजून घेऊन कामे केल्यास दिवस चांगला राहील.
सामाजिक क्षेत्रात पुढाकार घेऊन कामे कराल. इतरांसाठी आपण केलेल्या कामाचे आज योग्य ते फळ मिळणार आहे. वरिष्ठाकडून आपले विशेष कौतुक होईल. दिवस चांगला आहे.
अडचणींवर मात करून पुढे जायला पाहिजे असा काही दिवस नाही. सहज आणि विनासायास यश आपल्याला मिळेल. जे घडणार आहे त्याकडे सजगतेने बघणे गरजेचे आहे.
अचानक घबाड मिळाले कि काय! इतका पैसा आज आपल्या नशिबामध्ये आहे. पण तो वाम मार्गाने येणार नसावा हे लक्षात ठेवून कामे करावीत. कष्टाला पर्याय नाही हे समजून जाणे आणि काम करणे आज गरजेचे आहे.