Sakshi Sunil Jadhav
सध्या मुलांना किंवा पालकांनाही ख्रिसमच्या सुट्ट्या मिळणार आहेत. तुम्ही अशा मस्त गुलाबी थंडीच्या वातावरणात जाऊन फिरण्याचा प्लान करत असाल तर महाराष्ट्रातील सगळ्यात बेस्ट हिडन स्पॉट म्हणजे नागपूर आहे.
तुम्ही नागपुरमध्ये पोहोचला असाल तर जवळच तुम्हाला चिखलगरा पाहायला मिळेल. तिथे कमी गर्दी आणि सुंदर हिल स्टेशनवर मौज मज्जा करता येईल.
नागपुरनंतर तुम्ही विदर्भातल्या चिखलदऱ्यातील गुलाबी थंडी नक्कीच अनुभवली पाहिजे. तसेच हिरवळसुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळेल.
कामामुळे होणाऱ्या ताणामुळे वैतागून गेला असाल तर निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ थांबल्याने तुम्हाला सकारात्मक ऊर्जा नक्कीच मिळेल.
चिखलदऱ्यांमधील सुंदर निसर्ग, मेळ घाटाचा व्याघ्र प्रकल्प तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तसेच प्राणी प्रेमींसाठी वाघ, हरिण यांसारखे प्राणी पाहायला मिळतील.
तुम्हाला फिरायला गेल्यावर इतर स्पॉट्स पाहायला मिळतील. त्यामध्ये हरिकेन पॉइंट, सनसेट पॉइंट, देवी पॉइंट पाहून तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल.
तुम्हाला नागपूरजवळ भिमकुंड, मोजरी पॉइंट, प्रॉस्पेक्ट हिल, गविलगड किल्ला आणि मेळघाट टायगर रिजर्व पाहता येतील.
नागपूरहून साधारण 5 ते 6 तासांच्या ड्राइव्हने चिखलदऱ्याला पोहोचता येते. बडनेरा जंक्शन जवळचं रेल्वे स्टेशन आहे.
नागपूर विमानतळ हा सर्वात जवळचा एअरपोर्ट असून तिथून रस्तेमार्गे सहज प्रवास करता येतो.