Shravan Recipe 2023  Saam tv
लाईफस्टाईल

Shravan Recipe 2023 : श्रावणात नैवेद्यासाठी स्वीट डिश बनवायचा आहे? ट्राय करा पौष्टिक तिळाची खीर, पाहा रेसिपी

Recipe : तुम्हाला तेच तेच गोडाचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करुन पाहा.

कोमल दामुद्रे

Til Kheer : श्रावण महिन्यात अनेक सण व उत्सव असतात. या महिन्यात आपण अनेक गोडाचे पदार्थ खातो. तुम्हाला तेच तेच गोडाचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करुन पाहा.

तांदूळ, शेवाळ्यांची खीर आपल्या घरी अनेकदा तयार केली जाते, पण तुम्ही कधी तिळाची खीर चाखली आहे का? पौष्टिकतेने युक्त तिळाची खीर चवीलाही अप्रतिम असते. तिळाची खीर फायदेशीर असते, त्यामुळे श्रावणाच्या सोमवारी उपवास असला तरी तुम्ही ती सहज खाऊ शकता. हे अन्नपदार्थ खाल्ल्याने दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहते.

तीळ (sesame) खूप फायदेशीर आहे आणि फायबरने भरपूर असल्याने ते पचनाच्या दृष्टीनेही चांगले असते. तुम्हालाही हा सोमवार स्पेशल बनवायचा असेल तर तुम्ही तिळापासून बनवलेल्या खीरची रेसिपी करून पाहू शकता.

1. साहित्य

  • पांढरे तीळ - 1 कप

  • दूध - 1 लिटर

  • साखर (Sugar) - 1/2 कप

  • किसलेले खोबरे - 2 चमचे

  • चिरलेले बदाम (Almond) - 8-10

  • पिस्ते चिरलेले - 1 टीस्पून

  • वेलची पावडर - 1 टीस्पून

2. कृती

  • तिळाची खीर बनवण्यासाठी प्रथम पांढरे तीळ घ्या आणि स्वच्छ करा.

  • यानंतर एका कढईत तीळ टाका आणि थोडा वेळ कोरडा भाजून घ्या. नंतर पॅन थंड होण्यासाठी ठेवा.

  • तीळ थंड होत असताना एका मोठ्या भांड्यात दूध ओतून मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा.

  • दूध गरम होण्यासाठी 8-10 मिनिटे लागतील. दरम्यान, तीळ थंड झाल्यावर बारीक वाटून घ्या.

  • दुधाला उकळी आल्यावर त्यात बारीक वाटलेले तीळ टाका आणि दूधात बरोबर मिक्स करा.

  • 1-2 मिनिटे शिजवल्यानंतर खीरमध्ये किसलेले खोबरे घालून मिक्स करावे.

  • यानंतर खीरमध्ये बारीक चिरलेले बदाम आणि चवीनुसार साखर घाला. आता झाकण ठेवून 5-7 मिनिटे खीर शिजवा.

  • यानंतर गॅस बंद करून तुमची स्वादिष्ट तिळाची खीर तयार आहे. खीर सर्व्ह करताना पिस्त्याच्या कापांनी सजवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Damage Causes: दारू न पिताही लिव्हर खराब करतात 'या' सवयी; वेळीच व्हा सावध

Nilesh Ghaywal: निलेश घायवळचं लंडन पलायन, पासपोर्ट प्रकरणावर चंद्रकांत पाटलांची चुप्पी, धंगेकरांना वेगळीच शंका

Uddhav Thackeray : शेतकरी भाजपमध्ये आले तर कर्जमाफी? दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला

Maharashtra Live News Update: शिवसेनेकडून पूरग्रस्तांसाठी एक लाख 11 हजार रुपयांची मदत मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सुपूर्द

Dasara 2025: दसऱ्याला झेंडूची फुले का वापरली जातात? धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व

SCROLL FOR NEXT