सध्या श्रावण महिना सुरु आहे. या महिन्यात अनेक उपवास व धार्मिक गोष्टी केल्या जातात. यामध्ये शंकाराची पूजा व उपवास केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते. तसेच कांदा व लसणाचे पदार्थ खाणे देखील वर्ज्य मानले जाते.
श्रावण महिन्यात अनेक उपवासामुळे आपल्याला चविष्ट पदार्थ खाता येत नाही. परंतु, जर आम्ही तुम्हाला सांगितले की, या काळातही आपण चविष्ट अशी साउथ इंडियन स्टाइल फूड चाखू शकतो. जर तुम्हालाही यंदाच्या श्रावणात उपवासाचा डोसा खायचा असेल तर तर तुम्ही दक्षिण भारतीय पदार्थ बनवू शकता. पाहूया उपवासाच्या डोशाची रेसिपी
३-४ उकडलेले बटाटे (Potatoes)
2 टीस्पून तेल
1 टीस्पून जिरे
१ टीस्पून हिरवी मिरची
२-३ कढीपत्ता
मीठ
कोथिंबीर
भगर आणि साबुदाणा स्वच्छ धुवा आणि 6-7 तास भिजत ठेवा.
यानंतर ते ब्लेंडरमध्ये टाकून बारीक वाटून घ्या. एका मिक्सिंग बाऊलमध्ये वाटलेले पीठ, दही, पाणी, मीठ, आले आणि हिरवी मिरची घालून मिक्स करा.
त्याची सुसंगतता पातळ झाल्यावर झाकून ठेवा आणि १५ मिनिटे ठेवा.
बटाट्याचा मसाला बनवण्यासाठी कढईत तेल टाकून त्यात जिरे घालून तडतडू द्या. यानंतर त्यात हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घाला.
आता बटाटे घालून परतून घ्या आणि २ मिनिटे परतून झाल्यावर मीठ आणि तिखट घालून ५-७ मिनिटे शिजवा वरुन कोथिंबीर घाला मसाला भाजी तयार आहे.
यानंतर, पॅन गॅसवर ठेवून थोडे पाणी शिंपडून घ्या. पॅन गरम झाल्यानंतर त्यावर तयार डोशाचे मिश्रण पसरवून घ्या.
बटाट्याची भाजी घालून डोसा तयार करा व शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.