Shani Vakri In Kumbh Saam tv
लाईफस्टाईल

Shani Vakri In Kumbh : राहू-केतू युतीमुळे मोठा बदल ! या 3 राशी होतील धनवान, करिअरमध्ये होईल उलाढाल...

Rahu Ketu Yuti : या ग्रहांच्या वक्रीमुळे लोकांच्या जीवनात अशांतता निर्माण होते.

कोमल दामुद्रे

Vakri Shani Kumbh : ज्योतिष शास्त्रानुसार शनि आणि राहू-केतू या ग्रहांची युती ही शुभ व अशुभ परिणाम देते. नुकतेच शनिने आपला मार्ग बदलला आहे. शनिच्या या उलट्या मार्गक्रमणांमुळे अनेक राशींची धाकधूक वाढणार आहे.

वैदिक ज्योतिषशास्त्रात शनी (Shani) आणि राहू-केतू या ग्रहांची वक्री अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण या ग्रहांच्या वक्रीमुळे लोकांच्या जीवनात अशांतता निर्माण होते. 17 जून रोजी शनी वक्री झाला आहे. तर राहू आणि केतू हे ग्रह नेहमी वक्रीच असतात. हे तिन्ही ग्रह एकाच वेळी वक्री झाल्यामुळे काही राशींना लाभ होईल तर काहींना समस्यांना (Problem) सामोरे जावे लागेल.

यावेळी राहू मेष राशीत तर केतू तूळ राशीत आहे. 30 ऑक्टोबर रोजी राहू-केतूचे संक्रमण होईल. राहू मीन राशीत तर केतू कन्या राशीत प्रवेश करेल. पण त्याआधी 30 ऑक्टोबरपर्यंत शनी, राहू आणि केतू प्रत्येकाच्या जीवनावर मोठा प्रभाव टाकतील. जाणून घेऊया शनि आणि राहू-केतू काही लोकांसाठी खूप शुभ परिणाम देतील.

1. मिथुन:

शनि, राहू आणि केतू मिथुन राशीच्या लोकांना खूप लाभ देईल. हा काळ या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये वाढ देऊ शकतो. उत्पन्नही वाढेल. अडकलेला पैसा मिळेल, ज्यामुळे तुमच्या आर्थिक (Career) समस्या दूर होतील. तणाव कमी होईल. तुम्ही आनंदी राहाल आणि प्रगती कराल. यासोबतच तुम्ही तुमच्या प्रगतीबद्दलही समाधानी असाल.

2. तूळ:

शनि आणि राहू-केतू तूळ राशीच्या लोकांना चांगले परिणाम देतील. जुन्या समस्यांपासून सुटका मिळेल. शारीरिक-मानसिक वेदना दूर होतील. धनलाभ होईल. उत्पन्न वाढेल. उत्पन्न वाढल्याने आर्थिक स्थितीत बळ येईल. तसेच जे पैसे अडकले होते तेही या वेळेत मिळतील.

3. मकर :

शनीची वक्री राहू-केतू मकर राशीला ३० ऑक्टोबरपर्यंत फायदेशीर परिणाम देतील. या तीन ग्रहांच्या कृपेने तणाव आणि समस्यांपासून आराम मिळेल. आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली पगारवाढ आता मिळणार आहे. तुमच्या जीवनसाथीला वेळ द्या, त्याच्याशी चांगले वागा. यामुळे वैवाहिक जीवनात आनंद मिळेल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makar Sankranti 2026: तब्बल १९ वर्षांनंतर होणार चमत्कार; 'या' ३ राशींचं नशीब संक्रांतीला उजळणार

अंबरनाथमध्ये शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी खेळी; अजित पवारांच्या नेत्याची उपनगराध्यक्षपदी निवड

Maharashtra Live News Update : लातूरमध्ये भाजपा उमेदवाराच्या नातेवाईकडून पैसे वाटल्याचा प्रकार

Makeup Tips: ब्लश, ब्रॉन्झर आणि हायलाइटरमध्ये नेमका फरक काय?

Solapur Politics: मोठी बातमी! सोलापुरात भाजपकडून अजित पवारांना धक्का, मतदानाआधीच राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार फोडला

SCROLL FOR NEXT