Kojagiri Purnima 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Kojagiri Purnima 2023 : कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी पडतेय चंद्रग्रहणाची सावली करा हे उपाय, लक्ष्मी देवी राहिल नेहमी प्रसन्न

Sharad Purnima 2023: आपल्या देशात अमावस्या आणि पौर्णिमा याही विशेष मानल्या जातात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kojagiri Purnima Upay :

हिंदू धर्मात सर्व सण मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात. प्रत्येक व्रताची आणि प्रत्येक सणाची स्वतःची एक कथा असते, जी सगळ्यात महत्त्वाची असते. आपल्या देशात अमावस्या आणि पौर्णिमा याही विशेष मानल्या जातात. 

अश्विन महिन्यातील या पौर्णिमेला 'शरद पूनम' किंवा 'रास पौर्णिमा' असेही म्हणतात, जे शरद ऋतूच्या आगमनाचे लक्षण आहे. यंदा आश्विन शुक्ल पक्षातील पौर्णिमा 28 ऑक्टोबर म्हणजेच शनिवारी येत आहे. या दिवशी सर्व स्त्रिया (Women) भगवान चंद्रदेवाची पूजा करतात आणि उपवास करतात आणि आपल्या कुटुंबाच्या सुख, समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतात.

पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहणाची सावली

यावेळी आश्विन शुक्ल पक्षातील पौर्णिमा 28 ऑक्टोबर म्हणजेच शनिवारी येत आहे. पौर्णिमा (Purnima) तिथी दुपारी 1.45 पर्यंत चालेल. मात्र यावेळी शरद पौर्णिमेच्या दिवशी ग्रहणाची सावली पसरली आहे.

शरद पौर्णिमेला चंद्रोदय कधी होईल?

पंचांगानुसार, अश्विन महिन्याची पौर्णिमा 28 ऑक्टोबर रोजी पहाटे 04:17 वाजता सुरू होईल आणि 29 ऑक्टोबर रोजी पहाटे 01:53 वाजता समाप्त होईल.

देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा हे उपाय

  • शरद पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री विष्णूसह धनाची देवी लक्ष्मी यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी व्यक्तीने या दिवशी विधीनुसार उपासना करावी. असे मानले जाते की शरद पौर्णिमेला विधीनुसार उपासना केल्यास व्यक्तीचे आर्थिक प्रश्न दूर होतात आणि त्याला देवी लक्ष्मीची पूर्ण कृपा प्राप्त होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

  • हिंदू मान्यतेनुसार, पूजेत वापरल्या जाणार्‍या सुपारीच्या पानांमुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होऊ शकते. अशा स्थितीत या वर्षी धनदेवतेकडून इच्छित आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या घरातील देवी लक्ष्मीच्या फोटोसमोर पूजेचा विडा अर्पण करावा.

  • शरद पौर्णिमेला देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विधीनुसार श्रीयंत्र स्थापित करून तिची पूजा करावी आणि श्रीसूक्त किंवा लक्ष्मी स्तोत्राचा पाठही करावा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने धनाची देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते.

कोजागिरी पौर्णिमेला या गोष्टी चुकूनही करू नका

  • जर तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा मिळवायची असेल तर या पौर्णिमेला दिवसा चुकूनही झोपू नये.

  • या दिवशी काळे कपडे घालू नयेत पण शक्य असल्यास पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे घालावेत.

  • कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी व्यक्तीने कोणत्याही प्रकारचे अम्ली पदार्थांचे सेवन करू नये.

  • कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीचा आशीर्वाद मागणाऱ्यांनी कोणाशीही वाद घालू नये. असे मानले जाते की लक्ष्मी क्रोधित होते आणि कलह भरलेले घर सोडून जाते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Children Day Meaning: 14 नोव्हेंबरला बालदिन का साजरा करतात?

नवरा लटकलेला, तर पत्नी अन् ३ मुलांचे मृतदेह खाटेवर; हृदयाचा थरकाप उडवणारी घटना

Children's Day Special: बालदिनानिमित्त तुमच्या मुलांसोबत आज पाहा हे खास चित्रपट

Bihar Election Result Live Updates: दिग्विजय सिंह यांनी सांगितले काँग्रेसच्या पिछाडीचे कारण

IND vs SA VIDEO: लेगमध्ये त्याचा कॅच मिळतो...! टेम्बा बवुमासाठी पंतने आपल्या स्टाईलने लावली फिल्डींग; पुढच्याच बॉलला गेली विकेट

SCROLL FOR NEXT