Ruchika Jadhav
कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध बनवण्यासाठी १ लिटर दूध घ्यावे.
तुमच्या चवीनुसार यात तुम्ही साखर टाकावी. साधारण आर्धा कप साखर टाकली पाहिजे.
तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही बारीक करून घ्यावेत.
दूधाला चांगला स्वाद यावा यासाठी यामध्ये तुम्ही वेलची पूड टाकू शकता.
वेलची पूडसह जायफळची पावडर देखील या दूधात टाकावी.
काळे तिळ किंवा खसखस देखील काही जण दूधात टाकतात.
दूधाला सुंदर रंग यावा यासाठी त्यामध्ये केसर टाकावे.
हे दूध कमी गॅसवरती चांगलं तापवून घ्या.
दूध तापवताना चांगली उकळी आल्यावर गॅस आणखी कमी करावा.
तयार दूध तुम्ही फ्रिजमध्ये थंड करून नंतर पिऊ शकता.