Sabudana Rabdi Recipe Saam TV
लाईफस्टाईल

Sabudana Rabdi Recipe: साबुदाणा रबडी! एकदा खाल तर 'या' रेसिपीचे दिवाने व्हाल; उपवासासाठी सुद्धा बेस्ट

Shravan Month Special Sabudana Rabdi Recipe in Marathi: उपवासाला फळे आणि साबुदाण्याचे विविध पदार्थ खाल्ले जातात. साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे आणि साबुदाणा खीर, रबडी देखील बनवली जाते.

Ruchika Jadhav

सध्या श्रावण महिना सुरू झाला आहे. श्रावणात अनेक व्यक्ती उपवास करतात. या काळात महादेवाची मनोभावे सेवा केली जाते. त्यासाठी कुटुंबातील सर्व व्यक्ती उपवास करतात. उपवासाला फळे आणि साबुदाण्याचे विविध पदार्थ खाल्ले जातात. साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे आणि साबुदाणा खीर, रबडी देखील बनवली जाते.

अनेक व्यक्तींना गोड पदार्थ खूप आवडतात. त्यामुळे आज साबुदाणा रबडी कशी बनवायची याची माहिती जाणून घेणार आहोत. उपवासासाठी किंवा मग तुम्ही आवड म्हणून देखील ही रबडी खाऊ शकता. चला तर मग झटपट याची रेसिपी जाणून घेऊ.

साहित्य

साबुदाणा - 1 कप

दूध- 1/2 लीटर

साखर - 4 चमचे

केळी- 1 फळ

सफरचंद - 1 फळ

फ्रेश व्हाईट क्रीम - 1 कप

डाळिंब - 2 चमचे

केसर - 4 ते 5 कड्या

गुलाब पाकळ्या - 3 ते 4

बदाम - 5 ते 6

उपवास किंवा व्रत असेल तर ही साबुदाणा रबडी बनवण्यासाठी आधी रात्रभर साबुदाणे पाण्यात भिजत ठेवा.

त्यानंतर रबडीसाठी अतिशय महत्वाचं असलेलं दूध घ्या. दूध फुल फॅट क्रीम असलेलं घ्या. या दुधाला एक उकळी येऊ द्या. त्यानंतर दूध मंद आंचेवर थोडं कमी होईपर्यंत तापवून घ्या.

त्यानंतर साबुदाणे या दुधात टाकून घ्या. दुधाचे प्रमाण आणखी घट्ट होपर्यंत तापवून घ्या.

पुढे यामध्ये साखर मिक्स करा. साखर टाकून ती पूर्ण विरघळू द्या. त्यानंतर गॅस बंद करा.

दुधाचे तापमान नॉर्मल झाले की, यामध्ये केळी, सफरचंद, डाळिंबाचे दाणे आणि फ्रेश क्रीम टाकून घ्या.

हे मिश्रण एकत्र करून फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्या. मिश्रण छान थंड होऊ द्या.

त्यानंतर तुम्ही जेव्हा हे खाण्यासाठी घ्याल त्यावेळी यामध्ये वरून गुलाबाच्या पाकळ्या आणि केसर टाकून घ्या.

अशा पद्धतीने बनवलेले रबडी फार चविष्ट आणि मदत लागते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT